दीपिका पादुकोणने कॅटला दिलेला रणबीरसोबतच्या लग्नाबाबतचा ‘सल्ला’ सध्या खूप गाजला. यानंतर तिने मी असे काही बोललेच नाही, असेही म्हटले. या सर्व प्रकारानंतर रणबीर आणि दीपिका पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. या बहुचर्चित जोडीचा ‘तमाशा’ आता पडद्यावर पाहायला मिळणार आहे. रणबीर-दीपिका सध्या त्यांच्या ‘तमाशा’ या चित्रपटाच्या अखेरच्या टप्प्यातील शूटिंगसाठी दिल्लीमध्ये एकत्र दिसणार आहेत. पुढच्या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या या (एक्स) कपलची केमिस्ट्री प्रेक्षकांना कितपत रिझवेल कोणास ठाऊक ?
दीपिका-रणबीरची केमिस्ट्री ?
By admin | Updated: January 20, 2015 22:41 IST