Join us  

Pathaan Box office: 500 कोटींचा गल्ला जमवणारा पहिला बॉलिवूड चित्रपट ठरला पठान, आणखी धमाके करायला शाहरुख तयार 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 12:19 PM

25 जानेवारीला रिलीज झालेल्या पठानने केवळ 21 दिवसांत 498.85 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. तर 22व्या दिवशी 500 कोटींच्या क्लब मध्ये सामील झाला.

बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) चित्रपट "पठान" 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. या चित्रपटात शाहरुख सोबतच दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहम (John Abraham) यांचीही मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट कलेक्शनच्या बाबतीत नव नवे विक्रम करताना दिसत आहे. 25 जानेवारीला रिलीज झालेल्या पठानने केवळ 21 दिवसांत 498.85 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. तर 22व्या दिवशी 500 कोटींच्या क्लब मध्ये सामील झाला.

किती झाले पठानचे कलेक्शन -शाहरुख खानच्या पठानने केवळ 21 दिवसांतच 498.85 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. तसेच, Sacnilk च्या अर्ली ट्रेंड्सनुसार, या चित्रपटाने 22व्या दिवशी जवळपास 4 कोटींचे कलेक्शन केले. यानुसार हा चित्रपट आता 500 कोटी रुपयांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. 500 कोटी रुपयांच्या क्लबमध्ये सामील होणारा हा पहिला बॉलिवूड चित्रपट आहे. यातच आता, पठानची टक्कर बाहुबली 2 सोबत आहे. ज्याचे कलेक्शन 511 कोटी रुपये एवढे आहे.

पहिला दिवस: 57 कोटी रुपयेदुसरा दिवस: 70.50 कोटी रुपयेतिसरा दिवस: 39.25 कोटी रुपयेचौथा दिवस: 53.25 कोटी रुपयेपाचवा दिवस: 60.75 कोटी रुपये6वा दिवस: 26.50  कोटी रुपये7वा दिवस: 21 कोटी रुपये8वा दिवस: 18.25 कोटी रुपये9वा दिवस: 15.65 कोटी रुपये10वा दिवस: 14 कोटी रुपये11वा दिवस: 23.25 कोटी रुपये12वा दिवस: 28.50 कोटी रुपये13वा दिवस: 8.55 कोटी रुपये14वा दिवस: 7.75 कोटी रुपये15वा दिवस: 6.75 कोटी रुपये16वा दिवस: 5.95 कोटी रुपये17वा दिवस: 5.90 कोटी रुपये  18वा दिवस: 11.25 कोटी रुपये  19वा दिवस: 13 कोटी रुपये20वा दिवस: 4.20 कोटी रुपये21वा दिवस: 5.61 कोटी रुपये 22वा दिवस: 4 कोटी रुपये (अर्ली ट्रेंड)

शाहरुखचे प्रोजेक्ट्स -शाहरुख खानच्या पठानने धमाका केला आहे. पठाननंतर आता शाहरुख खान, 'डंकी' आणि 'जवान' मध्येही दिसणार आहे. राजकुमार हिरानीचा चित्रपट डंकीमध्ये शाहरुख खानची जोडी तापसी पन्नू सोबत असेल. हा चित्रपट 22 डिसेंबर 2023 ला चित्रपटगृहांत प्रदर्शित होईल. या दोन्ही चित्रपटांशिवाय, शाहरुख, दग्दर्शक अॅटलीसोबतही जवान या चित्रपटात दिसेल. यातील शाहरुखचा लुक नुकताच लिक झाला असून तो सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. शाहरुखचा जवान, 2 जून 2023 रोजी हिंदीबरोबरच तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :शाहरुख खानपठाण सिनेमादीपिका पादुकोणजॉन अब्राहम