Join us

पोलमध्ये पीसीची दीपिका पादुकोणवर मात

By admin | Updated: September 6, 2016 13:37 IST

दीपिका पादुकोण आणि प्रियांका चोप्रा आज आघाडीची नावे आहेत. बॉलिवुडपाठोपाठ आता हॉलिवूडमध्येही या दोघींमध्ये स्पर्धा सुरु झाली आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ६ - बॉलिवुडमध्ये दीपिका पादुकोण आणि  प्रियांका चोप्रा आज आघाडीची नावे आहेत. बॉलिवुडपाठोपाठ आता हॉलिवूडमध्येही या दोघींमध्ये स्पर्धा सुरु झाली आहे. क्वांटिकोमुळे प्रियांका चोप्राची हॉलिवूडमध्ये एक इमेज तयार झाली असली तरी, दीपिकाही तिच्यापेक्षा फार मागे नाही. 
 
पुढच्यावर्षी या दोघी हॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहेत. दीपिकाचा XXX 3 जानेवारीत आणि प्रियांकाचा 'बे वॉच' मे महिन्यात प्रदर्शित होत आहे. या पार्श्वभूमीवर एका इंग्रजी वर्तमानपत्राने दोघींची लोकप्रियता जाणून घेण्यासाठी एक पोल घेतला. 
 
आणखी वाचा 
 
दोघींच्या दोन वेगवेळया मॅगझीनच्या कव्हरपोस्टवरील फोटोवर चाहत्यांना मत देण्याचे आवाहन करण्यात आले. यात दीपिकाला ४१.७५ टक्के वोटस मिळाले तर, प्रियांकाला ५८.२५ टक्के मते मिळाली. त्यामुळे पहिल्या राऊंडमध्ये तरी पीसीने दिपिकावर मात केली आहे.