Join us  

'रंग माझा वेगळा' मालिकेनं निरोप घेतल्यामुळे दीपा झाली भावुक, म्हणाली - मालिका संपल्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 6:19 PM

Rang Maza Vegla : 'रंग माझा वेगळा' मालिका गेली चार वर्षे प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करत आहे. हल्लीच या मालिकेने १००० भागांचा टप्पा पार केला होता. आता मालिका शेवटच्या टप्प्यात आली आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका रंग माझा वेगळाने कमी कालावधीत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. या मालिकेतील दीपा आणि कार्तिकच्या केमिस्ट्रीला चाहत्यांची खूप पसंंती मिळाली.आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिका निरोप घेणार त्यामुळे दीपा म्हणजेच रेश्मा शिंदे भावुक झाली आहे. 

रेश्मा शिंदे हिने इट्स मज्जा या युट्यूब चॅनेलला दिलेल्या एका मुलाखतीत तिला विचारले की, सेटवरील एक अशी गोष्ट जी तुझ्या कायम लक्षात राहील, ती कोणती? त्यावर रेश्मा म्हणाली की, लँच टाइम. हा मला कायम लक्षात राहील आहे. जेव्हा सेटवर लँच टाइम होतो तेव्हा आम्हाला खूप मज्जा येते. असा कुठलाच दिवस नाही की, आम्ही लँच टाइम कोणी नसतो. कोणी कोणाशी भांडू दे, चिडू दे, रुसवे फुगवे असू दे किंवा कोणाच्या तरी वैयक्तिक जीवनात काही घडले जरी असेल तरी कधी कोणीच लँच टाइम मिस केला नाही. आमच्या तिथे खूप गप्पा होतात. म्हणून आम्ही सरांना सांगतही असतो की, वेळेत ब्रेक करा वगैरे. त्यामुळे मालिका संपल्यानंतर हा गोष्टीची मला खूप आठवण येईल.

रंग माझा वेगळा मालिका गेली चार वर्षे प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करत आहे. हल्लीच या मालिकेने १००० भागांचा टप्पा पार केला होता. आता मालिका शेवटच्या टप्प्यात आली आहे. त्यामुळे सध्या मालिकेतील कलाकार मंडळींच्या भावुक पोस्ट पाहायला मिळत आहेत.
टॅग्स :रेश्मा शिंदे