Join us  

Debina Bonnerjee Baby Girl: टीव्हीवरील 'सीता' देबिना बनर्जी दुसऱ्यांदा झाली आई, म्हणाली- वेळेच्या आधीच...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 1:44 PM

टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री देबिना बॅनर्जी दुसऱ्यांदा आई झाली आहे. तिने एका मुलीला जन्म दिला आहे. ७ महिन्यांपूर्वीच देबिनाने लियानाला जन्म दिला आहे.

Debina Bonnerjee Baby: छोट्या पडद्यावरील सीता म्हणजेच देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. देबिना पुन्हा एकदा आई झाली आहे. काही मिनिटांपूर्वी देबिनाने आपल्या मुलीच्या जन्माची बातमी सोशल मीडियावर एका सुंदर नोटसह चाहत्यांशी शेअर केली होती. सोशल मीडियावर स्टार्स आणि चाहत्यांकडून अभिनंदनाच्या वर्षाव दोघांवर करण्यात आला आहे. 

डिलिव्हरीनंतर देबिना बॅनर्जीने इंस्टाग्रामवर चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. देबिनाने गुरमीत चौधरीसोबतचा स्वतःचा एक सुंदर फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो देबिनाच्या मॅटर्निटी फोटोशूटमधील आहे. यासोबत देबिनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आमच्या बाळाचे जगात स्वागत आहे. आम्‍ही पुन्‍हा आई-बाबा झाल्‍याचा खूप आनंद होतोय,  यावेळी आम्ही तुमच्याकडून प्रायव्हसीची अपेक्षा करतो कारण बाळाचा जन्म वेळेच्या आधीच झाला आहे. तुम्ही प्रेमाचा आणि आशीर्वादांचा वर्षाव आमच्यावर असाच करत राहा. 

देबिना बॅनर्जीने ३ एप्रिलला लियानाला जन्म दिला. तिच्या जन्मानंतर अवघ्या महिन्याभरातच ती दुसऱ्यांदा आई होणार असल्याची बातमी शेअर केली होती. यादरम्यान केवळ देबिना बॅनर्जीच नाही तर गुरमीत चौधरीलाही ट्रोल करण्यात आले. 

देबिन-गुरमीतची लव्हस्टोरीछोट्या पडद्यावर गाजलेल्या ‘रामायण’ या मालिकेत गुरमीत चौधरीने प्रभू श्रीरामाची तर त्याची पत्नी देबिनाने सीता मातेची भूमिका साकारली होती. या मालिकेच्या सेटवर ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. 2006 मध्ये देबिना व गुरमीत यांनी घरून पळून जाऊन लग्न केलं होतं. गुरमीतने या लग्नाचे काही फोटो शेअर केले होते. यानंतर 2011 साली गुरमीत व देबिना यांनी पुन्हा लग्न केलं. कुटुंबीयांच्या उपस्थितीत नोंदणी पद्धतीनं हे लग्न पार पडलं होतं. 

टॅग्स :गुरमीत चौधरीटिव्ही कलाकार