Join us  

सुनील दत्त यांनी आणलेली एकही साडी नर्गिस यांनी नेसली नाही, जाणून घ्या आणखी खास गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2018 9:48 AM

आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांची आठवण काढली जात आहे. त्यामुळे त्यांच्या विषयीच्या काही खास गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आणि सुनील दत्त यांची पत्नी नर्गिस दत्त यांनी आजच्याच दिवशी जगाचा निरोप घेतला होता. आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांची आठवण काढली जात आहे. त्यामुळे त्यांच्या विषयीच्या काही खास गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

आपल्या काळात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या नर्गिस या किती ताकदीच्या अभिनेत्री होत्या हे त्या काळातील सर्वांनाच माहीत आहे. पण महत्वाची बाब म्हणजे नर्गिस यांना डान्सर आणि अभिनेत्री कधीच व्हायचं नव्हतं. त्यांना डॉक्टर होऊन समाजसेवा करायची होती. 

मदर इंडियावेळी पडल्या प्रेमात

नर्गिस दत्त आणि सुनील यांच्यात याच सिनेमावेळी प्रेम झालं होतं. नर्गिस दत्त यांचा साधेपणा सुनील दत्त यांना भावला होता. त्यांच्याlतील प्रेम वाढण्याचं कारण ठरली ती या सिनेमाच्या सेटवर लागलेली आग. या सिनेमाच्या शेवटच्या सीनवेळी सेटला आग लागली होती. या आगीत नर्गिस दत्त अडकल्या होत्या. यावेळी आपल्या जीवाची पर्वा न करता सुनील दत्त यांनी नर्गिस यांना वाचवण्यासाठी आगीत उडी घेतली आणि सुखरुप बाहेर काढले होते.

सुनील दत्त यांची साडी कधीच परिधान केली नाही

लग्नानंतर सुनील दत्त यांना कळाले की, नर्गिस यांना साड्यांची फार आवड आहे. त्यामुळे सुनील कुठेही जायचे तेव्हा नर्गिस यांच्यासाठी साडी घेऊन येत होते. काही दिवसांनी त्यांच्या असे लक्षात आले की, त्यांनी आणलेल्या साड्या नर्गिस या नेसत नाहीत. त्यांनी विचारल्यावर नर्गिस यांनी सांगितले होते की, सुनील यांनी आणलेल्या साड्या मला आवडत नाहीत. काही साड्यांचे रंग त्यांना पसंत नव्हते तर काहींचं कॉम्बिनेशन त्यांना आवडलं नाही. पण त्यांनी या साड्या कधीही स्वत:पासून दूर ठेवल्या नाहीत.

राज कपूरसाठी नर्गिस यांनी विकले होते दागिणे

राज कपूर आणि नर्गिस यांच्या प्रेमाची चर्चा आजही होते. आवारा सिनेमाच्या शूटिंग दरम्यान एक गाणं शूट करण्यासाठी राज कपूर यांनी 8 लाख रुपये खर्च केले होते. तर संपूर्ण सिनेमावर 12 लाख रुपये खर्च झाले होते. त्यामुळे सिनेमा ओव्हरबजेट झाला. यावेळी नर्गिस यांनी आपले दागिने विकून राज कपूर यांनी मदत केली होती. त्यांनी दुसऱ्या निर्मात्यांचे सिनेमे करुन आर के स्टुडिओची रिकामी तिजोरी भरण्याचे काम केले होते, असे म्हटले जाते.

नर्गिस यांचा आजार

1980 उजाळेपर्यंत नर्गिस या कॅन्सरसोबत लढा देत होती. या आजाराच्या उपचारानुसार नर्गिस या कोमात गेल्या होत्या. सुनील दत्त त्यांना उपचारासाठी अमेरिकेला घेऊन गेले होते. पण शेवटी त्यांचा 3 मे 1981 मध्ये मृत्यु झाला होता.

टॅग्स :नर्गिसबॉलिवूड