Join us

डॅडी हृतिकची मुलांसोबत स्पेन ट्रीप!

By admin | Updated: March 13, 2016 21:08 IST

स्पे नला मुले रेहान आणि हिृदानसोबत ट्रीपला जायचं म्हणून डॅडी हृतिक रोशनने आगामी चित्रपट ‘मोहंजोदारो’चे शूटिंग पुढे ढकलले आहे.

स्पे नला मुले रेहान आणि हिृदानसोबत ट्रीपला जायचं म्हणून डॅडी हृतिक रोशनने आगामी चित्रपट ‘मोहंजोदारो’चे शूटिंग पुढे ढकलले आहे.  कुटुंब कामाच्या अगोदर येते, हे हृतिकच्या वागण्यावरून कळते. सूत्रांनुसार, हृतिकला स्पेनला एका जाहिरातीच्या शूटसाठी जायचे होते. त्याच्या मुलांनाही तो सोबत घेऊन जाणार होता. त्याचे जाहिरातीचे काम झाल्यानंतर तो त्यांच्यासोबत तिथे वेळ घालवणार होता आणि नंतर मग घरी जाणार होता, पण ‘मोहंजोदारो’ची शूटिंग त्याने वडिलांचा चित्रपट ‘काबील’साठी पुढे ढकलले असल्याची अफवा पसरली होती, तसेच चर्चा अशीही आहे की, आमीर खान ‘दंगल’च्या प्रदर्शनाची तारीख थोडी अगोदरची घेणार आहे आणि ‘मोहंजोदारो’ १५ आॅगस्टला प्रदर्शित होणार होता. त्यामुळे एकाच दिवशी दोन्ही चित्रपट प्रदर्शित होऊ नयेत, असे हृतिकला वाटतेय. त्याला आमीरसोबत बॉक्स आॅफिसवर टक्कर घ्यायची नाही.