Join us  

Aryan Khan Drug Case: आर्यनच्या सुटकेसाठी वकिलांची नवी योजना; उचलणार महत्त्वाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 5:19 PM

Aryan Khan Drug Case: या प्रकरणी आज एनडीपीएस कोर्टात आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. मात्र, न्यायालयाने पुन्हा एकदा आर्यनचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

ठळक मुद्देउद्या आर्यनची १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी संपणार आहे.

Aryan Khan Drug Case: अभिनेता शाहरुख खानचा (Shahruk Khan) मुलगा आर्यन खानच्या (Aryan Khan) अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. २ ऑक्टोबर रोजी मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात (Mumbai Cruise Drugs Case) आर्यनला अटक करण्यात आली. या प्रकरणी आज एनडीपीएस कोर्टात आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. मात्र, न्यायालयाने पुन्हा एकदा आर्यनचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे आर्यनची रवानगी पुन्हा एकदा आर्थर रोड (Arthur Road Jail) तुरुंगात झाली आहे. त्यातच आर्यनला सोडवण्यासाठी शाहरुख आणि त्याचे वकील प्रचंड प्रयत्न करत असून आता आर्यनच्या वकिलांनी एक नवीन योजना आखल्याचं सांगण्यात येत आहे.

काय आहे आर्यनच्या वकिलांची नवी योजना?

एनडीपीएस कोर्टाने आर्यनचा जामीन अर्ज नाकारल्यामुळे आता आर्यनचे वकील मुंबई उच्च न्यायालयात (bombay high court) धाव घेणार आहेत. आज (२० ऑक्टोबर) किंवा गुरुवारी आर्यनच्या जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अपील केलं जाणार आहे. विशेष न्यायालयाने आर्यनचा जामीन नाकारल्यानंतर आता या निर्णयाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करणार येणार असल्याचं आर्यनच्या वकिलांनी सांगितलं आहे. आता विशेष न्यायालयाने फक्त ऑपरेटिव्ह ऑर्डर दिली असून त्यासंदर्भातला सविस्तर आदेश हातात आल्यानंतर नेमकं जामीन नाकारण्यासाठी काय कारण देण्यात आलं आहे, हे समजू शकेल, असं देखील त्याच्या वकिलांनी सांगितलं.

Aryan Khan Drugs Case : आर्यन खानला दणका; एनडीपीएस कोर्टाने जामीन फेटाळला

दरम्यान, उद्या आर्यनची १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी संपणार आहे. मात्र, त्यापूर्वीच न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे त्याला पुन्हा तुरुंगात रहावं लाहणार आहे. एनडीपीएस कोर्टाने आज आर्यनचा जामीन फेटाळल्यानंतर त्याचे वकील मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहेत.  

टॅग्स :मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टीआर्यन खाननार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोअमली पदार्थ