Join us

कॉक्सचे मुलीसाठी प्रयत्न

By admin | Updated: September 10, 2016 02:13 IST

हॉलीवूड अभिनेत्री कर्टनी कॉक्स मुलगी कोको हिला हॉलीवूडमध्ये आणण्यासाठी उत्सुक आहे.

हॉलीवूड अभिनेत्री कर्टनी कॉक्स मुलगी कोको हिला हॉलीवूडमध्ये आणण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळेच ती आतापासूनच मुलीला अ‍ॅक्टिंगचे धडे देत आहे. कर्टनीला विश्वास आहे की, एक यशस्वी अभिनेत्री बनण्याचे सर्व गुण तिच्या मुलीत आहेत. कर्टनीला १२ वर्षांची मुलगी कोको पहिला पती डेविड आरकेट याच्यापासून झाली आहे. फिमेलफर्स्ट डॉट कॉम डॉट यूके या वेबसाइटच्या माहितीनुसार, कर्टनीने फॉय वेंसच्या गाण्यात कोकोला यापूर्वीच संधी दिली आहे. आता तिने पडद्यावर झळकावे अशी तिची इच्छा आहे.