‘इश्कजादे’ आणि ‘शुद्ध देसी रोमान्स’सारख्या हिंदी चित्रपटातून बॉलीवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी परिणितीची चोप्रा सध्या तिच्या ‘दावत- ए- इश्क’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. ‘दावत- ए- इश्क’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी परिणितीने लखनौ ते हैदराबाद असा प्रवास केला आहे. 19 सप्टेंबरला तिचा हा चित्रपट रिलीज होत आहे. सध्या कामात बिझी असलेल्या परिणितीने प्रत्येक तीन महिन्यांनी सुटीवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. परिणिती नुकतीच यूके ट्रीपवरून परतलीय.