Join us

आत्मशांतीच नंबर - 1

By admin | Updated: April 27, 2017 18:19 IST

हिंदी चित्रपटसृष्टीत एके काळी रसिक प्रेक्षकांवर अधिराज्य गाजविणारे विनोद खन्ना यांची लोकमतच्या 26 जानेवारी 2014 च्या मंथन पुरवणीत प्रकाशित झालेली संग्रहित मुलाखत

 - विश्वास खोड - 

हिंदी चित्रपटसृष्टीत एके काळी रसिक प्रेक्षकांवर अधिराज्य गाजविणारे नाव म्हणजे विनोद खन्ना. अभिनयसंपन्नता आणिकर्तृत्वाचे वरदान लाभूनही पहिल्या क्रमांकाच्या स्पर्धेत राहण्यासाठी त्याने स्वत:ची कधीच दमछाक होऊ दिली नाही. असा हा हरहुन्नरी अभिनेता पुण्यात आलेला असताना त्याच्याशी  साधलेला मुक्त संवाद. विनोद खन्ना. खलनायक, नायक आणि आता चरित्रनायक. गेली ४८ वर्षे ते हिंदी चित्रपटसृष्टीत आहेत. दोन वर्षांनी त्यांच्याकारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण होतील. त्यांना भेटण्याचा आणि मनमुराद गप्पा मारण्याचा योग नुकताच आला. अस्सखलित इंग्रजीतून, ओघवत्या हिंदीतून ते बोलले. या तास-दीड तासात त्यांचा हजरजबाबीपणा, नर्मविनोदी स्वभाव, शांत आणिसभ्य व्यक्तित्त्वाची झलक अनुभवायला मिळाली, आध्यात्मिक विचारसरणी समजली. माणूस खूप देखणा. कोण्या लेखकानं गंधर्वाची उपमा दिलेली. जन्म पाकिस्तानातला. बालपणानंतर मुंबईत वास्तव्य. शालेय वयात नाटकांमध्ये केलेली कामं. वैविध्यपूर्ण भूमिका केल्यानंतर त्यांचा दिग्दर्शन करण्याचा विचार आहे. आत्मचरित्रही लिहायचंय. मराठी त्यांना उत्तम बोलता येतं. मराठीतून आॅफरच आली नाही. चांगला रोल मिळाला, तर मराठीतही काम करू, असं ते म्हणाले. पुण्याचं बदलतं स्वरूप, शास्त्रीय संगीत महोत्सव, इथल्या योग संस्था याविषयीही ते भरभरून बोलले. पत्रकार परिषदांमध्ये नेते किंवा कितीही मोठेव्हीआयपी आले, तरी पत्रकार स्वत: उठून उभे राहत नाहीत, असा अनेक वर्षांचा अनुभव. त्याला अपवाद ठरले विनोद खन्ना. ते हॉलमध्ये येताच सारे पत्रकार उभे राहिले. नंतर त्यांच्याकडेच पाहत राहिले. खन्नांनी मनमुराद गप्पा मारल्या. जोष, उत्साह, मर्दानी देखणेपणा यांमुळं आणि ऋजू स्वभावामुळं लोक पूर्वीइतकेच आजही त्यांच्याभोवती आकृष्ट होतात. प्रश्नांमागून प्रश्न सुरू झाल्यावर खन्ना यांनी ह्यआप कोई किताब लिख रहे है क्या?ह्णअसं विचारलं. त्यामुळं हशा होऊन वातावरण आणखीनच मोकळं झालं.त्यांच्याशी झालेला संवाद असा :

 

 - चित्रपटसृष्टी सोडून ओशो संन्यासी झाल्यावर एक नंबर होणं राहून गेलं. त्याबद्दल काही खंत?- मैने सोच के सब छोड दिया था, न.. मुझेलगा मेरा गुरू मुझे इतना कुछ दे रहा है.. हेअध्यात्माचे जे विश्व आहे, ज्याला हजारो वर्षांची परंपरा आहे. आध्यात्मिक ज्ञानाची. उसका भी अनुभव लेना चाहिये. जब अनुभव लेना शुरू कर दिया मेरे गुरूके साथ, इतना कुछ होने लगा. बदलाहट आने लगी. मन की शांती मिलने लगी. तो एैसा लगा, यही अब कुछ साल करना चाहिये. फिल्म इंडस्ट्रीत बरंच काही करून झालं होतं. तो निर्णय विवेकाने घेतला होता. मला त्याचा कधीही पश्चात्ताप होत नाही. ओशोंनी आम्हाला जे दिले, ते खूप जास्त आहे. मला ध्यानधारणेतला सखोल अनुभव घ्यायचा होता. निर्वाण म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय, हे मला जाणून घ्यायचे होते. मी ध्यानधारणेला खूप आधीपासून सुरुवात केली होती. महर्षी माहेश्वरी यांच्यासोबत. माझ्याही आधी विजय आनंद ओशो आश्रमात होते. महेश भट्ट आणि मी बरोबरच तेथे होतो. मी ओशोंची पुस्तके वाचली. नंतर त्यांना प्रत्यक्ष ऐकण्यासाठी पुण्यात आलो. - राजकारण, अभिनय आणि अध्यात्म यात ताळमेळ कसा घातला? आयुष्याच्या सर्व क्षेत्रांत अध्यात्म आहेच. ध्यानधारणा म्हणजे दुसरं-तिसरं काही नाही, तर आपल्या मनाचा मालक असणं. अध्यात्मात व्यवसाय येतो, कुटुंब येतं, सगळं काही येतं. आध्यात्मिक व्यक्ती राजकारणात असेल, व्यवसायात किंवा आणखीकोणत्या क्षेत्रात, अध्यात्मामुळे तुम्हाला कोणत्याही गोष्टीची जाण लवकर येते. आयुष्याची जाण येते. शांततेनं मला भारून टाकल्यावर मी पुन्हा चित्रपटसृष्टीत आलो. मला माझी पूर्वीचीच जागा परत मिळाली. चाहत्यांचे प्रेम मिळाले. सेवा कार्यासाठीराजकारणात गेलो. खासदार झालो मंत्रीही झालो. आयुष्य छोटे असते, खूप काही करण्यासारखे असते,असे मला आज वाटते आहे.- अमेरिकेतून परत आल्यानंतर अमिताभसोबत कामाची आॅफर आली होती? पुन्हा आॅफर आली, पण आम्हा दोघांसाठी तशी  स्क्रिप्ट  नव्हती.

 

- आजच्या पिढीला खूप वैविध्यपूर्ण भूमिका करायला मिळत आहेत. तुमच्या तरुणपणी असं असतं तर? आम्ही एकाच वेळी २५ ते ३० चित्रपटांचं चित्रीकरण करत होतो. जी गोष्ट नायकाची, तीच संवादलेखकाचीही असे. कधीकधी संवादलेखक सेटवर येऊन  सीन  लिहीत असे. त्याचा मूड सांभाळणे, त्याला स्वत:कडे आकर्षित करणे हे सगळं चालायचं. चार घंटे उस प्रोड्युसर के साथ, तीन घंटे उस डायरेक्टर के साथ. और आज कल के अ‍ॅक्टर्स करते है, एक वक्त पर एक फिल्म. त्याला तयारी करायला वेळ मिळतो. तो शरीरयष्टी बनवू शकतो. आमच्या वेळी जीम नव्हत्या. काहीही नव्हते. जोर- बैठका काढायचो. त्यावरच सगळं होतं...पण, आम्ही व्हरायटी आॅफ रोल केले नाहीत, असे नाही.

प्रश्न : निवडणुका जवळ आल्यात. तुम्ही पंजाबमधून लढणार की मुंबईतून? आय एम नॉट ए पर्सन हू चेंज हिज कॉन्स्टिच्युअन्सी. इतने साल लगते है, आपको लोगोंके साथ रिलेशनशिप बनाने मे. काम किया होताहै.- आपमे जो नेता है और अभिनेता है, उसमे से आप किसको जादा पसंद करते है? नेता को रिटेक का मौका नही मिलता...

 

 -  पुण्यात घर असावं, असं कधी वाटलं नाही का? मुंबईनंतर माझे पुणे सर्वांत आवडते शहर आहे. मी ओशो आश्रमात तीन वर्षे राहिलो आहे. तेव्हापुणे खूप सुंदर होते. भगव्या वस्त्रातले संन्यासी सर्वत्र हिंडताना दिसत. आता हे शहर बरेच वाढले आहे. इथे अनेक योगसंस्थाआहेत. शास्त्रीय संगीताचा महोत्सव होतो. पंडित भीमसेन जोशींसारखे गायक येथे होते. फिल्म इन्स्टिट्यूट येथे आहे.- पुन्हा चित्रपटनिर्मिती करताय का?हिमालय पुत्रह्णनंतर मी चित्रपट निर्माण केला नाही. माझ्या मुलाला अक्षयला पुढे आणण्यासाठी मीतो पिक्चर केला. त्याचा पहिलाच चित्रपट चांगला चालला. त्यामुळं पुन्हा चित्रपटनिर्मिती करावीशी वाटली नाही. मला राजकारणामुळे वेळ होत नाही. नाही तर अक्षयसाठीच नव्हे, तर इतरांसाठीही चित्रपट निर्माण केले असते. आता मला दिग्दर्शनात रस वाटतो. मी माझ्या दिग्दर्शकाला मदत करत असतो. ज्या चित्रपटांत काम करतो, त्यांचा मी साहाय्यकदिग्दर्शक असतो. एखादी चांगली संधी मिळाली, तर दिग्दर्शनही करेन. माझ्या पहिल्याच चित्रपटात मला चांगले एक्सपोजर मिळाले. नंतर मी मागे वळून पाहिले नाही. मला स्ट्रगल करावी लागली नाही. माझा आलेख उंचावतच गेला. मी लोकांकडे पाहतच शिकत गेलो. मी कसे काम करतो आहे, हे सांगणारा गुरू मला नव्हता. अचानक,  शक,  मेरे अपने,  मेरा गाँव मेरादेश  अशा चित्रपटांमुळे मला खूप वेगवेगळ्या भूमिका करता आल्या. ह्यमेरा गाँव मेरा देशह्णमधील माझ्या डाकूच्या भूमिकेला मोठा प्रतिसाद मिळाला. अभिनय हे न संपणारं व्यसनमुलाखतीदरम्यान खन्ना म्हणाले, ह्यफिल्म इंडस्ट्रीत माझा कोणी गॉडफादर नव्हता. अपघातानेच मी चित्रपटसृष्टीत आलो.व्यापाराची पार्श्वभूमी असलेल्या माझ्या कुटुंबात चित्रपटांत काम करण्याचं स्वप्न म्हणजे महापाप होतं. अशा वेळी १९ व्या वर्षी एका पार्टीत सुनील दत्त यांनी मला पाहिलं. त्यांनी मला ह्यमन का मीतह्ण या त्यांच्या चित्रपटात काम करण्यास सांगितलं. मी कॅमेऱ्याला पहिल्यांदा सामोरा गेलो आणि बस्स. त्यानंतर मागं वळून पाहिलंच नाही. तेव्हाच अभिनयात मनस्वी आनंद आहे, हे मला समजलं. फिल्म इंडस्ट्रीनं माझ्यासमोर ठेवलेली आव्हानं मी पेलली. खूप वैविध्यपूर्ण भूमिका केल्या. हे क्षेत्र नेहमी नवनवीन काही करण्याचे समाधान देत असते. अभिनय हे माझं न संपणारं व्यसन आहे. आयुष्यापेक्षाही खूपकाही या क्षेत्रानं मला बहाल केलं.