Join us

कॉर्पोरेट जगतावर येतोय मराठीत चित्रपट

By admin | Updated: August 16, 2015 23:00 IST

नवनवीन विषय, मांडण्याची पद्धत, सादरीकरण यामुळे प्रेक्षकांच्या मराठी चित्रपटाबद्दलच्या अपेक्षा खूप उंचावल्या आहेत़ आता हेच पाहा ना, आजवर कॉर्पोरेट जगतावर

नवनवीन विषय, मांडण्याची पद्धत, सादरीकरण यामुळे प्रेक्षकांच्या मराठी चित्रपटाबद्दलच्या अपेक्षा खूप उंचावल्या आहेत़ आता हेच पाहा ना, आजवर कॉर्पोरेट जगतावर चित्रपट काढण्याचा प्रयत्न मराठीत तरी अजूनपर्यंत झाला नव्हता. पण ती कसरही ‘सुपर्ब प्लॅन’ हा चित्रपट भरून काढणार आहे. सत्यानंद गायतोंडे, तृप्ती भोईर, गिरीश परदेशी आणि राजेंद्र शिरसाट यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या टे्रलरने सोशल नेटवर्किंग साइट्सवर धुमाकूळ उडवून दिला आहे. या चित्रपटाचे शूटिंग कॅनडामध्ये झाले आहे, हे चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य.