Join us  

'कोर्टात येताना काळ्या रंगाचाच ड्रेस घाल, कारण..'; महाठग सुकेशने जॅकलीनला केला मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 1:12 PM

Sukesh Chandrashekhar: सुकेश सातत्याने जॅकलीनला मेसेज करत आहे.

महाठग सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar)  याने आतापर्यंत अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (jacqueline fernandez) हिला तुरुंगातून अनेक पत्र पाठवले आहेत. यापैकीच त्याचं एक पत्र सोशल मीडियावर लीक झालं आहे. या पत्रात त्याने जॅकलीनसाठी एक खास मेसेज लिहिला असून कोर्टात येताना काळ्या रंगाचा ड्रेस परिधान कर असं सांगितलं आहे. विशेष म्हणजे तिने काळ्या रंगाचाच ड्रेस का परिधान करावा या मागचं कारणही त्याने या पत्रात लिहिलं आहे.न्यूज18 च्या माहितीनुसार, सुकेश एका विदेशी मोबाईल नंबरवरुन जॅकलीनला सातत्याने मेसेज करत आहे. यातील एका मेसेजमध्ये त्याने जॅकलीनला काळ्या रंगाचा ड्रेस परिधान करण्यास सांगितला होता. हा मेसेज ३० जूनचा आहे.

मेसेजमध्ये नेमकं काय म्हणालाय सुकेश?

''बेबी, या महिन्याच्या  ६ तारखेला आपल्याला कोर्टात सुनावणीसाठी हजर रहायचं आहे. जर तू व्हिडीओ कॉनफन्स द्वारे हजर राहणार असशील तर प्लीज काळ्या रंगाचा कुर्ता किंवा काळ्या रंगाचे कपडे परिधान कर. ज्यामुळे मला कळेल की मी पाठवत असलेले मेसेज तुझ्यापर्यंत पोहोचतायेत  आणि तुझं माझ्यावर प्रेम आहे.  मला तुझी खूप आठवण येतीये. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू कायमस्वरुपी माझी आहेस'', असं सुकेशने पाठवलेल्या मेसेजमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, या मेसेजमध्ये त्याने आणखी एका गोष्टीवर भाष्य केलं आहे. ''मला माहितीये तुझ्या नावासोबत आणखी एक E जोडला जात आहे. त्यामुळे होणाऱ्या ट्रोलिंगमुळे तू वैतागली आहेस. पण, तू काळजी करु नकोस कारण, जरी हे लोक ट्रोल करत असले किंवा वायफळ बोलत असले तरी तू माझी राजकुमारी आहेस. तू रॉकस्टार आहेस. तू सुपरस्टार होण्याच्या मार्गावर आहेस'', असंही त्याने या पत्रात नमूद केलं आहे.

टॅग्स :जॅकलिन फर्नांडिसबॉलिवूडसेलिब्रिटी