Join us

मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा सुरेल आवाज आता बॉलीवूडमध्येदेखील...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2016 02:29 IST

एकीकडे राजकारणात आपल्या निर्णयाने व कामाने जनतेचे मन जिंकणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तर दुसरीकडे त्यांच्या पत्नी अमृता यांनी आपल्या सुरेल आवाजाने मराठीसहित

एकीकडे राजकारणात आपल्या निर्णयाने व कामाने जनतेचे मन जिंकणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तर दुसरीकडे त्यांच्या पत्नी अमृता यांनी आपल्या सुरेल आवाजाने मराठीसहित बॉलीवूड इंडस्ट्रीलादेखील भुरळ पाडली आहे. यापूर्वी त्यांनी मराठी ‘संघर्षयात्रा’ या चित्रपटासाठी पार्श्वगायन केले आहे. हा चित्रपट गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनावर आधारित होता. तसेच याच चित्रपटात त्या पहिल्यांदाच गायल्या होत्या. पण आता मात्र त्यांनी थेट मोठी उडी घेतल्याचे दिसते. अमृता या बॉलीवूड दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या ‘जय गंगाजल’ व कुणाल कोहली यांच्या ‘फिर से’ या चित्रपटासाठी गाणार आहेत. तसेच ‘जय गंगाजल’मध्ये गीतकार मनोज मंताशिर यांनी लिहिलेल्या ‘सब धान माती’ या गाण्याचे गेल्या महिन्यात रेकॉर्डिंग पूर्ण झाले आहे. हा चित्रपट २००३मध्ये आलेल्या गंगाजलचा सीक्वेल असून, येत्या ४ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये प्रियांका चोप्रा ही पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.