Join us  

Chetan Bhagat : चेतन भगत पत्नीसह पुन्हा कॉलेजमध्ये; खऱ्या आयुष्यातील '२ स्टेट्स'चा फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2023 11:43 AM

चेतन भगत आणि त्यांची पत्नी कॉलेजमध्ये कसे होते हे पाहायचे असेल तर नुकतेच चेतन भगत यांनी कॉलेजमधील  काही फोटो शेअर केले आहेत जे चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.

Chetan Bhagat : प्रसिद्ध लेखक चेतन भगत आणि त्यांची पत्नी अनुषा भगत यांच्या प्रेमकहाणीला आयआयएम अहमदाबाद (IIM Ahemdabad) मधून सुरुवात झाली. दोघेही कॉलेजमध्ये एकमेकांना भेटले आणि प्रेमात पडले. आपल्याच प्रेमकहाणीवर चेतन भगत यांनी २ States हे पहिले पुस्तक लिहिले. यावर २ स्टेट्स हा चित्रपटही आला ज्याला तुफान प्रतिसाद मिळालाय. पण खरंच चेतन भगत आणि त्यांची पत्नी कॉलेजमध्ये कसे होते हे पाहायचे असेल तर नुकतेच चेतन भगत यांनी कॉलेजमधील  काही फोटो शेअर केले आहेत जे चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.

२५ वर्षांनंतर चेतन भगत आणि त्यांची पत्नी अनुषा भगत पुन्हा  कॉलेजमध्ये गेले. आयआयएम अहमदाबादमध्ये रियुनियनचे (Reunion) आंदोलन करण्यात आले होते. कॉलेज कॅम्पस मधील फोटो त्यांनी शेअर केले आहेत. तर २ स्टेट्स सिनेमातील अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि आलिया भटचाही (Alia Bhat) फोटो आणि २५ वर्षांनंतर पुन्हा कॉलेजमध्ये गेलेल्याचा पत्नीसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. चाहत्यांना हे फोटो खूपच आवडलेत. 

अगदी स्वप्नातली प्रेमकहाणी आहे, मस्त कपल अशा कमेंट्स या फोटोंवर येत आहेत. अनेक जण २ स्टेट्स या पुस्तकाचे तर काही जण चित्रपटाचे चाहते आहेत. पण हे रिअल लाईफ कपल जास्त क्युट असल्याचं चाहते म्हणत आहेत.

टॅग्स :चेतन भगतदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टमहाविद्यालय