Join us  

'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?'मध्ये 'चंद्रमुखी'चा दबदबा, आदिनाथची खास पोस्ट; सर्वोत्त्कृष्ट अभिनेता कोण? 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 8:16 PM

महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? या सोहळयाच्या मंचावर पुरस्कार स्वीकारणं म्हणजे कलाकारांसाठी पर्वणीच असते.

महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? या सोहळयाच्या मंचावर पुरस्कार स्वीकारणं म्हणजे कलाकारांसाठी पर्वणीच असते. कारण पुरस्कार थेट प्रेक्षकांकडून मिळणं हे कलाकारासाठी खूप खास ठरतं. झी टॉकीज वाहिनी दरवर्षी प्रेक्षकांच्या मतानुसार महाराष्ट्रातील फेव्हरेट कोण? पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करत असते. यंदाचाही पुरस्कार सोहळा मोठ्या थाटात पार पडला आहे. 

पुरस्कार सोहळ्यात यावेळी 'चंद्रमुखी' सिनेमाचा दबदबा पाहयाला मिळणार असल्याचं दिसून येत आहे. याचं कारण म्हणजे अभिनेता आदिनाथ कोठारे यानं केलेली फेसबुक पोस्ट. आदिनाथनं महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? मध्ये चंद्रमुखी सिनेमाला मिळालेल्या पुरस्कारांबाबतची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. आदिनाथनं पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार 'चंद्रमुखी' सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकर हिला पुरस्कार मिळाल्याचं म्हटलं आहे. तर चंद्रा गाण्यासाठी अजय-अतुल आणि गायिका श्रेया घोषाल हिचंही पुरस्कारासाठी अभिनंदन केलं आहे. यासोबतच चंद्रमुखी सिनेमाचा दिग्दर्शक प्रसाद ओक याला धर्मवीर सिनेमातील दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या शर्यतीत यावेळी प्रसाद ओकसोबत आदिनाथ कोठारे, भाऊ कदम, मकरंद अनासपुरे, शरद केळकर, प्रथमेश परब, ललित प्रभाकर आणि अमेय वाघ यांना नामांकन मिळालं होतं. यंदाचं वर्ष हे अभिनेता प्रसाद ओकसाठी खूपच स्पेशल होतं असं म्हणावं लागेल. प्रसादला धर्मवीर या सिनेमातून जबरदस्त भूमिका मिळाली. महाराष्ट्राचा ढाण्या वाघ अशी ओळख असलेल्या आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारीत या सिनेमात आनंद दिघे यांची भूमिका प्रसाद ओकने जीवंत केली. त्याच्या लुकपासून ते अभिनयापर्यंत प्रत्येक गोष्ट हिट झाली. 'धर्मवीर… मुक्काम पोस्ट ठाणे' या सिनेमासाठी प्रसादला महाराष्ट्राचा फेव्हरेट अभिनेता या स्पर्धेत नामांकन मिळालं होतं. 

टॅग्स :आदिनाथ कोठारेप्रसाद ओक