बिपाशा बासूच्या करिअरचा वेग मंदावला असला, तरी तिच्याकडे चित्रपट नाही अशातला भाग नाही. तिच्याकडे सध्या हॉरर चित्रपटांच्या ऑफर्स जास्त आहेत. ‘अलोन’ नावाचा आणखी एक हॉरर चित्रपट तिला ऑफर झाला आहे. बिपाशाच्या करिअरमधील ही सर्वात आव्हानात्मक भूमिका असणार आहे. ती या चित्रपटात जुळ्या बहिणींच्या भूमिकेत दिसेल. विशेष म्हणजे त्या धडाने एकमेकांशी जुळलेल्या आहेत. एक बहीण दुष्टात्मा आहे, तर दुसरी सौम्य. त्यामुळे ही भूमिका निभावताना बिपाशाला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन भूषण पटेल करणार असून निर्माता कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक आणि प्रदीप अग्रवाल हे आहेत.
बिपाशाची आव्हानात्मक भूमिका
By admin | Updated: June 13, 2014 12:55 IST