‘पुली’मध्ये श्रीदेवीनेही निवडले असेच पात्रश्रीदेवी दोन दशकांच्या कालावधीनंतर ‘पुली’ या तामिळ सिनेमाद्वारे पुनरागमन करीत आहे. यात ती काल्पनिक-साहसिक भूमिका साकारत आहे. या चित्रपटात तिचे कजाग राणीचे पात्र असेल. मनीष मल्होत्रा हा श्रीदेवीचा पसंतीचा ड्रेस डिझायनर आहे. चित्रपटातील दागिने, विचित्र दिसणारा राजमुकुट यामुळे तिच्या क्रूरतेत अधिक भर पडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. श्रीदेवीप्रमाणे अनेकांनी अशा स्वरूपाच्या भूमिका साकारल्या आहेत. अधिकाधिक क्रूर दिसण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. हॉलीवूडमध्येही असाच ट्रेंड आहे. अशाच काही कलाकारांच्या या हटके भूमिकांची ही चर्चा...
अमृता सिंगअमृता सिंगने ‘सूर्यवंशी’ चित्रपटात सूर्यलेखा राणी साकारली होती. तिचा आत्मा सातत्याने भटकत असतो. असे या चित्रपटात दाखविण्यात आले आहे. अमृता यात नकारात्मक भूमिकेमध्ये दिसली होती. ---------सुझान सॅरेंडनसुझान सॅरेंडन हिने ‘एनचान्टेड’ चित्रपटात नरिसा राणीची भूमिका साकारली होती. सावत्र आई आपल्या मुलीचा नेहमी छळ करते असे पात्र तिने रंगवले होते. तिचे कपडे, दागिने सारे काही अद्वितीय असेच होते.-----------अमरीश पुरी‘हातिमताई’ या चित्रपटात अमरीश पुरीने जादूगारची भूमिका वठवली. हा चित्रपट बघून अमरीश पुरी यांच्या यापूर्वीच्या मोगँबो या पात्राची अनेकांना आठवण झाली होती. ----------के.के. मेननके.के. मेनन याने ‘द्रोण’ चित्रपटात रिज रईजादा हे पात्र का रंगवले आहे, अद्याप कोणाला कळले नाही. त्याचे संपूर्ण पात्र या चित्रटात फारसे भीतीदायक वाटत नाही. उलट हा चित्रपट पाहून हसूच अधिक येते.------------चार्लीज थेरॉनचार्लीज थेरॉन हिने ‘स्नो अँड व्हाइट अँड द हंट्समन’ या चित्रपटात स्नो व्हाइटच्या सावत्र आईची भूमिका केली होती. तिचा मुकुट, कानापासून लोंबकळणारे दागिने, तिचे आग ओकणारे डोळे थरारक भासायचे.रोहिणी हट्टंगडीचालबाज या चित्रपटात रोहिणी हट्टंगडीची वेशभूषा पाहण्याजोगी होती. केसांची स्टाईल अगदी वेगळी, विचित्र चेहरा, सोनेरी दागिने, हटके वस्त्रे परिधान करून ती पडद्यावर अवतरली होती. तिचा हा मेकअप आजही सर्वांना लक्षात आहे.विवेक ओबेरॉयखलनायकाची भूमिका रंगविताना विवेक ओबेरॉयने ‘क्रिश-३’ चित्रपटात कालची भूमिका केली आहे. या चित्रपटातील त्याची भूमिका फार गाजली नसली तरी त्याचे २८ किलोंचे कवच मात्र लक्षात राहण्याजोगे आहे. अँजेलिना जोलीअँजेलिना जोली हिने मेलफिसंट चित्रपटात कजागिणीची भूमिका केली आहे. या भूमिकेबद्दल तिचे सार्वत्रिक कौतुकही झाले. तिचे भरजरी कपडे, सुंदर चेहऱ्याची कजागीण पाहताना प्रेक्षकांना वेगळाच भास व्हायचा.