- Rupali Mudholkar
सध्या बॉलिवूडमध्ये सीक्वल आणि प्रिक्वलचे वारे वाहतेय. गतवर्षी काही यशस्वी चित्रपटांचे सीक्वल आपण पाहिलेत. नव्या वर्षातही अशाच काही तुम्हा-आम्हाला भावलेल्या चित्रपटांचे सीक्वल, प्रिक्वल आणि रिमेक आपल्या भेटीला येणार आहेत. याच सीक्वलवर एक नजर...फुकरे 2सन २०१३मध्ये फुकरे आला आणि लोकांना हा चित्रपट जाम भावला. रिचा चढ्ढा, पुलकित सम्राट, वरुण शर्मा यांची भूमिका असलेल्या या चित्रपटाचा सिक्वल या नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. आता फुकरे 2 प्रेक्षकांना किती आवडतो, ते बघूच.नाम शबाना अक्षयकुमारचा बेबी हा सिनेमा आठवतोय? बेबीला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. बेबीला मिळालेले यश पाहून या चित्रपटाचा नाम शबाना या नावाने प्रिक्वल येतोय. यात तापसी पन्नू मुख्य भूमिकेत आहे. अक्षयकुमार यात कॅमिओ रोलमध्ये दिसणार आहे.जुडवा 2 १९९७मध्ये आलेला सलमान खानचा जुडवा सुपरहिट राहिला होता. आता याच चित्रपटाचा रिमेक येतोय आणि वरुण धवन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. जुडवा 2मध्ये सलमानच्या भूमिकेत वरुण कसा दिसतो ते बघूच.
बाहुबली 2बाहुबलीने बॉक्स आॅफिसवर एक इतिहास रचला. आता याच चित्रपटाचा बहुप्रतीक्षित सिक्वल बाहुबली : द कन्क्लुजन प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. ‘कटप्पाने बाहुबली को क्यों मारा?’ या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यास तुम्ही उत्सुक असाल. बाहुबली 2मध्ये आपल्याला याच प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे.जॉली एलएलबी 2जॉली एलएलबी या २०१३मध्ये आलेल्या सुपरहिट चित्रपटाचा जॉली एलएलबी 2 हा सिक्वल नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कोर्ट रूममधील कॉमेडीत या वेळी अक्षयकुमार आणि हुमा कुरेशी ही जोडी रंग भरेल. जॉली एलएलबीमध्ये अर्शद वारसी मुख्य भूमिकेत होता. त्याची जागा आता अक्षयने घेतलीय.
दबंग 3दबंग सिरीजमधला चुलबुल पांडे दबंग 3मधून पुन्हा एकदा आपल्या भेटीला येणार आहे. पण, दबंग 3 हा दबंगचा प्रिक्वल असेल. आता या प्रिक्वलमध्ये चुलबुल पांडे कसा रंग भरतो, ते आपण पाहणार आहोत.
२.०सन २०१०मध्ये सुपरस्टार रजनीकांत यांचा रोबोट हा सिनेमा आला होता. या चित्रपटाचा सिक्वल ‘२.०’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुमारे ४०० कोटी रुपयांचे बजेट असलेल्या या चित्रपटात प्रथमच रजनीकांत आणि अक्षयकुमार ही जोडी पाहायला मिळेल.गँग आॅफ वासेपूर 3गुन्हेगारी पार्श्वभूमीवर आधारित गँग आॅफ वासेपूर सिरीजमधील दोन्ही चित्रपट प्रेक्षकांना आवडले. आता या सिरीजमधील गँग आॅफ वासेपूर 3 आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पहिल्या व दुसऱ्या पार्टप्रमाणेच तिसऱ्या भागातील जबरदस्त डायलॉग्स ऐकण्यासाठी तयार राहा.