Join us  

सुहाना खान व अगस्त नंदा ‘या’ चित्रपटातून करणार डेब्यू? खुशी व इब्राहिमच्या नावाचीही चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 11:08 AM

होय, शाहरूखची लेक सुहाना खान लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार असल्याची चर्चा आहे.

बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खान गेल्या काही दिवसांपासून तसाही चर्चेत आहे. शाहरूखचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक झाली. 26 दिवस त्याला तुरुंगात राहावे लागले. या संपूर्ण काळात शाहरूखला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. आता आर्यनला जामीन मिळाला आहे. तो घरी परतला आहे आणि मुलगी सुहाना खान हिचे करिअरही मार्गी लागण्याची चिन्हं आहेत. होय, शाहरूखची लेक सुहाना खान (Suhana Khan) लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार असल्याची चर्चा आहे.

सुहानाच्या पहिल्या सिनेमात तिच्यासोबत महानायक अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा (Agastya Nanda)  दिसणार असल्याचं कळतंय. इतकंच नाही तर बोनी कपूर व श्रीदेवीची लेक खुशी कपूर शिवाय सैफ अली खान व अमृता सिंगचा मुलगा इब्राहिम खान हे दोघंही या चित्रपटात झळणार असल्याची चर्चा आहे. 

जोया अख्तरने  (Zoya Akhtar) नुकतीच तिचा आगामी चित्रपट ‘द आर्चीज’ची (The Archies) घोषणा केली आहे. हा चित्रपट आर्ची कॉमिक्सवर आधारित असून नेटफ्लिक्सवर स्ट्रिम होणार आहे. या चित्रपटाची माहिती देताना जोयाने आर्ची कॉमिक्सचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे.जोयाने या चित्रपटाच्या स्टारकास्टचा खुलासा केलेला नाही. पण या चित्रपटात सुहाना खान, अगस्त्य नंदा, खुशी कपूर लीड रोलमध्ये असल्याची चर्चा आहे. सैफ अली खान व अमृता सिंगचा मुलगा इब्राहिम अली याच्या नावाचीही चर्चा आहे. अद्याप याबद्दल अधिकृत घोषणा झालेली नाही. पण चर्चा जोरात आहेत.

जोयाच्या या चित्रपटात चार मित्रांची कथा पाहायला मिळेल टीजेन लाईफ शिवाय लव्ह ट्रंगलचा तडका असा हा सिनेमा असणार आहे.‘द आर्चीज’ या चित्रपटाच्या निमित्ताने जोया अख्तर आणि रीमा कागती पहिल्यांदा एकत्र काम करणार आहेत.  सुहाना खानबद्दल सांगायचे  तर ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहत्यांचे लक्ष लागलेले असते. तसेच तिच्या प्रत्येक फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असतो. सुहाना सध्या न्यूयॉर्कमध्ये  शिक्षण घेत आहे. ती सतत आपल्या मित्रांसोबत फोटो शेयर करताना दिसून येते. शाहरुखनंतर आता सुहानाला चित्रपटांमध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

टॅग्स :सुहाना खानखुशी कपूरशाहरुख खानअमिताभ बच्चन