Join us  

संजय लीला भन्साळीच्या 'ट्युजडेज अॅण्ड फ्रायडेज'मध्ये झळकणार 'हा' चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2018 1:35 PM

'ट्युजडेज अॅण्ड फ्रायडेज'मधून पूनम ढिल्लाँचा मुलगा अनमोल आणि नवोदीत अभिनेत्री झटलेका मल्होत्रा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. या चित्रपटात जोया मोरानी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

ठळक मुद्दे'ट्युजडे अॅण्ड फ्रायडे'मध्ये अनमोलसोबत झटलेका दिसणार मुख्य भूमिकेत जोया मोरानी देखील दिसणार प्रमुख भूमिकेत'ट्युजडे अॅण्ड फ्रायडे'च्या चित्रीकरणाला लंडनमध्ये सुरूवात

संजय लीला भन्साळीने आपल्या सिनेमात ऋषी कपूर व अनिल कपूर यांच्या मुलांसमवेत काही नवीन चेहऱ्यांना बॉलिवूडमध्ये संधी दिली आहे. त्याच्या बॅनरखाली बनत असलेल्या चित्रपट 'ट्युजडेज अॅण्ड फ्रायडेज'मधून पूनम ढिल्लाँचा मुलगा अनमोल आणि नवोदीत अभिनेत्री झटलेका मल्होत्रा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. त्यात जोया मोरानी या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

'ट्युजडे अॅण्ड फ्रायडे' चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात झाली असून अनमोलसोबत झटलेका मुख्य भूमिकेत दिसणार आहे. झटलेकाने २०१४ साली मिस इंडिया इंटरनॅशनलचा किताब जिंकला आहे. या चित्रपटात आता जोया मोरानीची देखील वर्णी लागली आहे. शिवम नायरच्या भाग जॉनी चित्रपटातून पदार्पण करणारी जोया या सिनेमाच लंडनमध्ये राहणार्या एनआरआय मुलीची भूमिका करणार आहे. तरणवीर सिंगच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या 'ट्युजडेज अॅण्ड फ्रायडेज' चित्रपटाचे शूटिंग लंडनमध्ये सुरू असून जोयादेखील लवकर सहभागी होणार आहे. जोयाने शाहरूख खानच्या ओम शांती ओम व हल्ला बोल सिनेमात सहायक म्हणून काम केले होते. 'ट्युजडेज अॅण्ड फ्रायडेज' चित्रपटाची कथा चार पात्रांवर आधारीत आहे. या सिनेमात अनमोल वरूणच्या आणि झटलेखा सियाच्या भूमिकेत दिसणार आहे. रीम शेख तान्या व इब्राहिम चौधरी श्रवणचा रोल साकारणार आहे. हा चित्रपट रोमांस व अॅक्शनवर आधारीत आहे. लंडननंतर या सिनेमाचे चित्रीकरण मुंबईत होणार आहे.'ट्युजडेज अॅण्ड फ्रायडेज' चित्रपटात पूनम ढिल्लाँ आणि निर्माता अशोक ठकेरिया यांचा मुलगा अनमोलची मुख्य भूमिकेसाठी निवड करण्यापूर्वी शाहिद कपूरला विचारण्यात आले होते. मात्र भन्साळीने जेव्हा पद्मावत चित्रपटातील महाराणा रावल रतन सिंगच्या भूमिकेसाठी निवड केल्यामुळे ट्युजडे अॅण्ड फ्रायडे चित्रपटात काम करण्यास त्याने नकार दिला.

टॅग्स :संजय लीला भन्साळी