Join us  

जोया मोरानीने सांगितली आपबिती, कोरोनामुळे झालीय तिची अशी अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2020 5:30 PM

जोयाने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून तिच्या शरीरात कोरोनाची कोणती लक्षणं जाणवत होती याविषयी सांगितले आहे.

ठळक मुद्देजोयाने इन्स्टाग्रामच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, माझे वडील, मी आणि माझ्या बहिणीला कोरोनाची लागण झाली आहे. माझ्या बहिणीत आणि वडिलांमध्ये कोरोनाची कोणतीच लक्षणं दिसत नव्हती. पण माझ्या शरीरात थोडी बहुत लक्षणं दिसत होती.

जगभरात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना भारतातही या व्हायरसचा विळखा घट्ट होत आहे. दिवसागणिक भारतात करोना संक्रमित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. चेन्नई एक्स्प्रेस, राजा हिंदुस्तानी, हॅपी न्यू ईअर असे अनेक सिनेमे प्रोड्यूस करणारे करीम मोरानी आणि त्यांच्या दोन्ही मुली जोया आणि शजा या कोरोना पॉझिटीव्ह आढळल्या आहेत. दोन्ही मुली कोरोना पॉझिटीव्ह असल्याने करीम मोरानी यांचीही टेस्ट केली गेली. यात ते पॉझिटीव्ह असल्याचे आढळले. आता करीम आणि त्यांच्या दोन्ही मुलींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

करीम यांची मुलगी जोया ही अभिनेत्री असून तिने नुकतीच तिच्या तब्येतीविषयी माहिती दिली आहे. जोयाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे आणि त्यात तिच्यात तिला कोरोनाची कोणती लक्षणं आढळली होती. त्यानंतर तिच्यावर काय उपचार करण्यात आले आणि या सगळ्यात रुग्णालयातील डॉक्टर आणि स्टाफची वागणूक कशी आहे याविषयी तिने लिहिले आहे. 

जोयाने इन्स्टाग्रामच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, माझे वडील, मी आणि माझ्या बहिणीला कोरोनाची लागण झाली आहे. माझ्या बहिणीत आणि वडिलांमध्ये कोरोनाची कोणतीच लक्षणं दिसत नव्हती. पण माझ्या शरीरात थोडी बहुत लक्षणं दिसत होती. लोकांना या व्हायरसबद्दल चांगल्याप्रकारे माहिती मिळावी म्हणून मी माझा अनुभव सगळ्यांसोबत शेअर करतेय... मला थोडासा ताप येत होता आणि छातीत दुखत होते. खरं तर थोडासा आराम केला तर इतरवेळी बरं वाटलं असतं...पण मी कोरोनाची टेस्ट करून घेतली. सध्या मी प्राणायम करत असून जास्तीत जास्त गरम पाणी पित आहे. त्याचा मला चांगलाच फायदा होत आहे. मी लवकरच पूर्णपणे बरी होऊन घरी जायची वाट पाहात आहे. येथील डॉक्टर, स्टाफ यांना पाहून मला आश्चर्याचा धक्का बसत आहे. ते सगळेच लोकांची खूपच चांगल्याप्रकारे काळजी घेत आहेत. त्यांचे कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीयेत. ते सतत प्रोटेक्टिव्ह सूट घालतात. पण त्यातदेखील ते प्रचंड कर्म्फटेबल आहेत. त्यात देखील ते तितकेच जलदगतीने काम करत आहेत. त्यांना सगळ्यांना सॅल्युट...

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या