Join us  

सँटा बनली, कॅमेरामॅन दिसताच मास्क उतरवून पोज द्यायला लागली; कोण आहे ही अभिनेत्री?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 2:07 PM

हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. आत्तापर्यंत हजारो लोकांनी तो पाहिला आहे.

ठळक मुद्दे‘वीर’नंतर हाऊसफूल २, हेट स्टोरी ३  या सिनेमातही ती दिसली होती. यानंतर मात्र तिचा ‘1921’ हा सिनेमा आपटला.

बॉलिवूड अभिनेत्री जरीन खानने सलमान खानसोबत ‘वीर’ चित्रपटातून डेब्यू केला होता. हुबेहुब कतरीना कैफ सारखी दिसते म्हणून तिची बरीच चर्चा झाली होती. हीच जरीन खान रविवारी मुंबईच्या रस्त्यावर सँटा बनून फिरताना दिसली. पण कॅमेरामॅन दिसताच, जरीन मास्क उतरवून पोज द्यायला लागली.जरीनचा व्हिडीओ voompla ने शेअर केला आहे. वांद्रयाच्या रस्त्यावर जरीन खान सँटा बनून फिरत होती. सँटाच्या लूकमध्ये फिरणा-या जरीनला खरे तर कोणीही ओळखले नाही. पण आपल्याला लोकांनी ओळखावे, असे जरीनला वाटले असावे. मग काय, पापाराझी दिसले अन् जरीनने मास्क हटवून त्यांना पोज देणे सुरू केले.

जरीनचा हा व्हिडीओ नाताळच्या पार्श्वभूमीवर प्रचंड व्हायरल होतोय. आत्तापर्यंत हजारो लोकांनी तो पाहिला आहे.कतरीना कैफसारखी दिसते म्हणून जरीनला  ‘वीर’  चित्रपट मिळाला होता. ‘वीर’ या सिनेमाच्यावेळी सलमान आणि जरीन यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले होते. पण काहीच दिवसांत या केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले होते. जरीन ही केवळ सलमान खानची सहकलाकार नाहीये तर त्याची ती मोठी चाहती देखील आहे.

तिने काही महिन्यांपूर्वी पिंकव्हिला या वेबसाईटला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने तिच्या करियरसंबंधी तसेच तिच्या खाजगी आयुष्याविषयी भरभरून गप्पा मारल्या होत्या. याच मुलाखतीत तिला विचारण्यात आले होते की, तुझ्या अफेअरच्या चर्चा होऊ लागल्या तर या चर्चा काय असतील असे तुला वाटते. त्यावर जरीनने एक गंमतीशीर उत्तर दिले होते. ती म्हणाली होती की, जर माझ्या अफेअरच्या चर्चा रंगल्या तर माझे नाव सलमानसोबत जोडले जावे... ही अफवा मला नक्कीच माझ्याबाबतीत ऐकायची आहे. एवढेच नव्हे तर सलमान माझ्याशी लग्न करणार अशी देखील चर्चा माझ्याबाबतीत व्हावी असे मला वाटते.

‘वीर’नंतर हाऊसफूल २, हेट स्टोरी ३  या सिनेमातही ती दिसली होती. यानंतर मात्र तिचा ‘1921’ हा सिनेमा आपटला. 2017 मध्ये रिलीज झालेला ‘अक्सर 2’ हा सिनेमाही फ्लॉप ठरला. यामुळे तिने पंजाबी व तेलगू सिनेमांकडे मोर्चा वळवला.

Then And Now : चित्रपटात येण्यापूर्वी अशी दिसत होती सलमान खानची हिरोईन जरीन खान, जुने फोटो पाहून बसेल धक्का

टॅग्स :जरीन खान