Join us

फसवणुकीच्या प्रकरणात जरीन खानला मोठा दिलासा, देश न सोडण्याचा कोर्टाचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 15:49 IST

न्यायालयाच्या परवानगीशिवाय जरीन देशाबाहेर जाऊ शकत नाही.

अभिनेत्री जरीन खानसा  2018 च्या फसवणूक प्रकरणात कोलकात्यातील  न्यायालयाने मोठा दिलासा मिळाला आहे. कोर्टाने अभिनेत्रीला अंतरिम जामीन मंजूर केला पण परवानगीशिवाय देश सोडू नये असे आदेशही दिले. आता ती न्यायालयाच्या परवानगीशिवाय देशाबाहेर जाऊ शकत नाही. फसवणूक प्रकरणी जरीन खानविरुद्ध काही महिन्यांपूर्वीच अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. याप्रकरणी कोलकात्याच्या सियालदाह न्यायालयाने अभिनेत्रीला २६ डिसेंबरपर्यंत दिलासा दिला आहे.

2018 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री जरीन खान कोलकाता येथे एका दुर्गापूजेच्या कार्यक्रमात परफॉर्म करणार होती. यासाठी तिने आयोजकांना होकार दिला होता आणि त्यासाठी १२ लाख रुपये अ‍ॅडव्हान्सही घेतले होते, असा आरोप आहे, पण अ‍ॅडव्हान्स घेऊनही अभिनेत्री कार्यक्रमाला पोहोचली नाही आणि कोणाला काही सांगितलेही नाही. आयोजकांचा आरोप आहे की ते जरीन खान येण्याची वाट पाहत राहिले, परंतु अभिनेत्रीने प्रतिसाद दिला नाही. वेळेवर न आल्याने त्यांनी जरीन खानविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. काही महिन्यांपूर्वी या प्रकरणी अभिनेत्रीवर अटक वॉरंट जारी करण्यात आले होते.

11 डिसेंबर रोजी कोलकात्याच्या सियालदाह न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना जरीन खान पोहोचली होती. सुमारे तासभर चाललेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने निर्णय देताना जरीन खानला २६ डिसेंबरपर्यंत ३० हजार रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केला. परवानगीशिवाय त्याने देश सोडू नये, असे आदेशही देण्यात आले आहेत.

जरीन खानने 2010 मध्ये सलमान खानच्या 'वीर' या चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर तिने '1921', 'हेट स्टोरी 3' आणि 'अक्सर 2' सारखे चित्रपट केले, पण तिला यश मिळाले नाही आणि ती चित्रपटांपासून दूर गेली आहे.

टॅग्स :जरीन खान