Join us  

सलमान खानने लाँच केले आहे या अभिनेत्रीला, एकेकाळी त्याच्यासोबत अफेअरच्या रंगल्या होत्या चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 6:00 AM

या अभिनेत्रीनेच सोशल मीडियावर तिचा लहानपणीचा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.

ठळक मुद्देजरीन सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून तिने काही महिन्यांपूर्वी तिच्या लहानपणीचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. तिच्या या फोटोला रसिकांची चांगलीच पसंती मिळाली होती.

जरीन खानचा आज वाढदिवस असून तिने वीर या चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिच्या पहिल्या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली होती. कारण तिला बॉलिवूडचा दबंग खान सलमान खानने बॉलिवूडमध्ये लाँच केले होते. कॅटरिना कैफसारखी जरीन दिसते म्हणून जरीनला ‘वीर’ चित्रपट मिळाला होता असे त्या काळात म्हटले गेले होते. एवढेच नव्हे तर या चित्रपटाच्यावेळी सलमान आणि जरीन यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले होते. सलमान अनेक समारंभात, पार्टीत जरीनसोबत उपस्थिती लावत असे. पण काहीच दिवसांत या केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले होते. सलमाननेच जरीनला बॉलिवूडमध्ये सेटल व्हायला मदत केली.

जरीनने वीर या चित्रपटानंतर हाऊसफुल २, हेट स्टोरी ३, अक्सर २ या चित्रपटांमध्ये काम केले. पण जरीनला बॉलिवूडमध्ये म्हणावी तशी लोकप्रियता मिळाली नाही. जरीन लवकरच हम भी अकेले तुम भी अकेले या चित्रपटात झळकणार असून या चित्रपटासाठी ती चांगलीच मेहनत घेत आहे. जरीन सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून तिने काही महिन्यांपूर्वी तिच्या लहानपणीचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. तिच्या या फोटोला रसिकांची चांगलीच पसंती मिळाली होती. या फोटोत ती खूपच गोड आणि निरागस दिसत होती. जरीन लहानपणीदेखील तितकीच सुंदर दिसायची असे तिच्या चाहत्यांनी तिला सोशल मीडियाद्वारे सांगितले होते.

जरीन ही केवळ सलमान खानची सहकलाकार नाहीये तर त्याची ती मोठी चाहती देखील आहे. तिने काही महिन्यांपूर्वी पिंकव्हिला या वेबसाईटला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने तिच्या करियरसंबंधी तसेच तिच्या खाजगी आयुष्याविषयी भरभरून गप्पा मारल्या होत्या. याच मुलाखतीत तिला विचारण्यात आले होते की, तुझ्या अफेअरच्या चर्चा होऊ लागल्या तर या चर्चा काय असतील असे तुला वाटते. त्यावर जरीनने एक गंमतीशीर उत्तर दिले होते. ती म्हणाली होती की, जर माझ्या अफेअरच्या चर्चा रंगल्या तर माझे नाव सलमानसोबत जोडले जावे... ही अफवा मला नक्कीच माझ्याबाबतीत ऐकायची आहे. एवढेच नव्हे तर सलमान माझ्याशी लग्न करणार अशी देखील चर्चा माझ्याबाबतीत व्हावी असे मला वाटते.

टॅग्स :जरीन खान