Join us  

तेव्हा कोव्हिड वॉरिअर्स असे वागतात...! ‘लीलावती’च्या कारभारावर भडकली जरीन खान

By रूपाली मुधोळकर | Published: September 22, 2020 12:16 PM

सलमान खानच्या अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ

ठळक मुद्दे जरीनच्या या व्हिडीओवर लोक भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री जरीन खान सध्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. होय, जरीनने तिच्या सोशल अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिने मुंबईच्या लीलावती रूग्णालयातील कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ज्यांना आपण कोव्हिड वॉरियर्स म्हणतो, प्रत्यक्षात ते गरज असताना साथ देत नाहीत, अशा शब्दांत तिने जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.जरीनच्या आजोबांची अलीकडे अचानक तब्येत बिघडली. यानंतर त्यांना लीलावती रूग्णालयात नेण्यात आले. यादरम्यानचा अनुभव तिने व्हिडीओत शेअर केला आहे.

व्हिडीओत ती म्हणते, ‘आजोबांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना आम्ही लीलावती रूग्णालयात घेऊन गेलोत. रूग्णालयाच्या बेसमेंटमध्येच एक कोव्हिड वार्ड आहे. तेथे प्रत्येक रूग्णाचे तापमान घेतले जाते. कोव्हिड-वॉर्डमध्ये  माझ्या आजोबांच्या शरीराचे तापमान नॉर्मल आले. तरीदेखील जबरदस्तीने त्यांची कोरोना टेस्ट करण्याबाबत सांगण्यात येत होते. माझे आजोबा 87 वर्षांचे आहेत. त्यांना केवळ युरीन इन्फेक्शनचा त्रास होत होता. कोरोना काळात ते पहिल्यांदा बाहेर पडले होते. त्यांना कोरोनाची कुठलीही शक्यता नव्हती. अशात लीलावतीच्या अटेंडंटने सर्वप्रथम त्यांची कोव्हिड-19 टेस्ट करण्यास सांगितले. मी आधी उपचार करा, अशी विनंती केली. मात्र आम्ही याच पद्धतीने काम करतो. हाच आमचा प्रोटोकॉल आहे, असे त्यांनी मला सुनावले त्यांची वागणूक विचित्र होती. काहीही झाले तरी याकाळात हॉस्पिलमध्ये जाऊ नका, असे मी मित्रांकडून ऐकले होते. याला त्यांनी बिझनेस बनवले आहे, असे मी ऐकत होते. आज मी त्याचाच अनुभव घेतला. माझे आजोबा इतके वयोवृद्ध आहेत आणि त्यांना उपचाराची गरज आहे, मात्र तरीही त्यांना कळले नाही. ज्यांना आपण कोरोना वॉरियर्स म्हणतो, प्रत्यक्षात त्यांनी अधिक गरज असताना ते आपल्याला अशी वागणूक देतात, असे जरीनने या व्हिडीओत म्हटले आहे.अखेर आम्ही आजोबाला घरी घेऊन आलोत. सकाळी त्यांना दुस-या हॉस्पिटलमध्ये नेले, असेही तिने सांगितले आहे.

Then And Now : चित्रपटात येण्यापूर्वी अशी दिसत होती सलमान खानची हिरोईन जरीन खान, जुने फोटो पाहून बसेल धक्का

आत्महत्या करणार होती जरीन खान; ‘या’ गाण्याचे शब्द ऐकताच बदलला निर्धार!

 

टॅग्स :जरीन खान