Join us  

झीनत अमान यांनी व्यापा-याविरोधात दाखल केला बलात्काराचा गुन्हा; आरोपीस अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 8:19 AM

बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांनी मुंबईच्या जुहू पोलिस ठाण्यात एका व्यापा-याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण ...

बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांनी मुंबईच्या जुहू पोलिस ठाण्यात एका व्यापा-याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण आता गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले आहे. सरफराज उर्फ अमन खन्ना असे या व्यापा-याचे नाव आहे. आरोपी सरफराज उर्फ अमन खन्ना याला अटक करण्यात आली आहे.झीनत अमान यांनी यावर्षी जानेवारीत अमन खन्ना विरोधात फसवणूक आणि धमकावण्यचा गुन्हा दाखल केला होता. अमन आपल्या घरी आला आणि त्याने माझ्या सुरक्षारक्षकाला मारहाण करत आपल्याला धमकावले, असे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले होते. अमन गेल्या काही दिवसांपासून आपल्याला व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लिल मॅसेज पाठवत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. आता झीनत यांनी अमनविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.हिंदी चित्रपटसृष्टीतील त्याकाळची अतिशय बोल्ड अन् ग्लॅमरस अभिनेत्री अशी ओळख मिळवणाºया  झीनत अमान यांनी ‘हरे कृष्णा हरे राम’, ‘सत्यम शिवम सुंदरम’ यांसारख्या अनेक चित्रपटांत काम केले. त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.   १९७० साली मिस एशिया पॅसिफिकचा किताब आपल्या नावी करणा-या झीनत अमान यांनी लॉस एंजलिमधून आपले शिक्षण पूर्ण केले होते़  यानंतर मॉडेलिंग क्षेत्रातून  आपल्या कारकिदीर्ची सुरुवात केली. १९७१ साली ओ.पी. राल्हन यांच्या ‘हलचल’ या सिनेमाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ८० च्या दशकांत प्रसिद्ध अभिनेते संजय खान आणि झीनत यांच्या प्रेमाच्या खूप चर्चा रंगल्या. त्यादरम्यानच्या काळात मासिकांमध्येही त्यांनी लग्न केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.ALSO READ :  झीनत अमान यांची व्यावसायिकाविरोधात पोलिसात धाव! धमकावणे आणि अश्लिल मॅसेज पाठवण्याचा आरोप!!कोण आहे सरफराज उर्फ अमन खन्नासरफराजची मानसिक स्थिती ठिक नसल्याचे सांगण्यात येते. बांगूर नगर येथेही त्याच्याविरोधात गुन्हेगारी प्रकरणे दाखल आहेत. गुंडगिरी आणि विक्षिप्त गोष्टी करण्याची त्याची सवय आहे. तो चित्रपटसृष्टीशी संबंधित असल्याचेही म्हटले जाते. काही वर्षे तो चित्रपटसृष्टीत होता. मग त्याने रिअल इस्टेटमध्ये काम करणे सुरू केले.