चक दे गर्ल सागरिका घाटगेने काढली क्रिकेटर झहीर खानची विकेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2017 10:23 IST
क्रिकेटर झहीर खान आणि चक दे इंडिया फेम सागरिका घाटगे यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून बरेच काही सुरु असल्याची चर्चा ...
चक दे गर्ल सागरिका घाटगेने काढली क्रिकेटर झहीर खानची विकेट
क्रिकेटर झहीर खान आणि चक दे इंडिया फेम सागरिका घाटगे यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून बरेच काही सुरु असल्याची चर्चा होती. या दोघांच्या रोमांसबाबत सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये चर्चा ही होती. नुकतेच सोशल झहीर खानने सागरिकासोबत त्याचा साखरपुडा झाल्याचे सांगत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. झहीर सध्या आयपीएल सीझन 10च्या दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचा कर्णधार आहे. आपल्या गोलंदाजीने अनेकांच्या विकेट्स घेतलेल्या झहीरची विकेट सागरिकाने अखेर काढलीच. साखरपुडा झाल्याची माहिती झहीरने ट्विटरवरुन दिली आहे. बायकोच्या चॉईसवर कधीही हसू नका. तुम्हीही तिचीच चॉईस असता. पार्टनरर्स फॉर लाईफ असे त्यांनी ट्वीट केले आहे. ट्वीटसोबत झहीरने साखरपुड्याचा एक फोटोसुद्धा शेअर केला आहे. नुकतेच युवराज आणि हेजलच्या लग्न समारंभात झहीर आणि सागरिकाने एकत्र आले होते. यानंतर त्यांच्या नात्याबाबतच्या चर्चेला उधाण आले होत. अखेर या चर्चांचा झहीरने पूर्णविराम दिला. सागरिका आणि झहीरने कधीचे त्यांचे नाते स्वीकारले नव्हते आणि नाकरले ही नव्हते. सागरिकाने शाहरुख खानच्या चक दे इंडिया या चित्रपटात महत्त्वाची भूमिका निभावली होती. याचित्रपट तिला एका क्रिकेटची गर्लफ्रेंड दाखवण्यात आली होते खऱ्या आयुष्याचा जोडीदार निवडताना ही सागरिकाने क्रिकेटरचीच निवड केली आहे. सागरिका आणि झहीरची ओळख त्याच्या एका कॉमन फ्रेंडने करुन दिली होती. दोघे एकमेकांना जवळपास एक दीड वर्ष डेट करत होते. मात्र याची भनक ही कोणाला लागली नव्हती. त्यानंतर काही सार्वजनिक ठिकाणी या दोघांना एकत्र पाहण्यात आले आणि यांच्या नात्याबाबत चर्चा सुरु झाली होती.