Join us  

सलमान खानने दिग्दर्शित केलेल्या नोटबुक चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 5:24 PM

‘नोटबुक’ हा सिनेमा येत्या २९ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या ट्रेलरला लोकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

ठळक मुद्देनोटबुक या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मैत्री, प्रेम आणि नात्यातील दुरावा यावर भाष्य करण्यात आले असून नात्यातील दुरावा, नात्यातील ओढ या गोष्टी खूपच चांगल्या प्रकारे मांडण्यात आलेल्या आहेत

सलमान खानने आजवर अनेक नव्या चेहऱ्यांना बॉलिवूडमध्ये संधी दिली आहे. आता सलमान खान निर्मित ‘नोटबुक’ या चित्रपटातून दोन नवे चेहरे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. हे दोन चेहरे म्हणजे, मोहनिश बहलची मुलगी प्रनूतन बहल आणि जहीर इक्बाल. प्रनूतन आणि जहीर यांच्या अभिनयाने सजलेला ‘नोटबुक’ हा सिनेमा येत्या २९ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या ट्रेलरला लोकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

नोटबुक या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मैत्री, प्रेम आणि नात्यातील दुरावा यावर भाष्य करण्यात आले असून नात्यातील दुरावा, नात्यातील ओढ या गोष्टी खूपच चांगल्या प्रकारे मांडण्यात आलेल्या आहेत. सलमानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर हा ट्रेलर शेअर केला असून त्यासोबत लिहिले आहे की, या २९ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होत असून कधीही एकमेकांना न भेटलेल्या पण प्रेमात पडलेल्या जोडप्याची कथा तुम्हाला चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे अधिकाधिक चित्रीकरण हे काश्मिरमध्ये झाले असून या चित्रपटाचा ट्रेलर पाहून तुम्ही चित्रपटाच्या सिनेमेटॉग्राफीच्या प्रेमात पडाल यात काहीच शंका नाही. या ट्रेलरमध्ये प्रनूतन बहल आणि जहीर इक्बालसोबतच काही लहान मुले देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. 

नोटबुक या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रशंसा बॉलिवूडमधील मंडळी देखील करत आहेत. या चित्रपटाची निर्मिती सलमान खानने केली असून या चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कक्करने केले आहे.

नोटबुक या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाद्वारे डेब्यू करणारी प्रनूतन चांगलीच चर्चेत आहे. सोशल मीडियावर तिच्या फॅन फॉलॉव्हिंगमध्ये मोठी वाढ झालेली दिसून येतेय. प्रनूतन सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह असते. इन्स्टाग्रामवर ती स्वत:चे रोज नवे फोटो शेअर करत असते. तिचे हे फोटो पाहिल्यानंतर प्रनूतन बॉलिवूडमध्ये बराच मोठा पल्ला गाठेल, अशी चर्चा आहे. 

टॅग्स :सलमान खानप्रनूतन बहल