Join us  

युवराज सिंगने निवृत्ती घेतल्यावर पत्नी हॅजेल कीचने लिहिली ही भावनिक पोस्ट, युवराजच्या या एक्स गर्लफ्रेंडने केली ही कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 7:36 PM

युवराजची पत्नी ही अभिनेत्री हॅजल कीच असून तिने सलमान खान, करिना कपूर यांच्या बॉडीगार्ड या चित्रपटात काम केले होते.

ठळक मुद्देहॅजलची ही पोस्ट अनेकांनी लाईक केली आहे. तसेच यावर अनेकांनी कमेंट देखील केली आहे. या पोस्टवर युवराजची पूर्व प्रेयसी किम शर्माने देखील चक्क कमेंट केले आहे. तिने अशाचप्रकारे तुम्ही दोघे चमकत राहा... असे लिहिले आहे. 

भारताच्या 2011च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचा शिल्पकार युवराज सिंगने निवृत्ती घेण्याचे नुकतेच जाहीर केले. मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्याने ही घोषणा केली. ही घोषणा करताना युवी भावुक झाला होता... 17 वर्षांच्या कारकिर्दीत मी अनेक चढउतार पाहिले. क्रिकेटने मला सर्व काही दिलं आणि म्हणून मी तुमच्यासमोर उभा आहे, असे तो म्हणाला. युवराज सिंगचे आयुष्य हे एखाद्या रोलर कोस्टर राईटसारखे आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरले नाही. कॅन्सरसारख्या आजारावर मात करत तो मैदानावर परतला होता. 

युवराजची पत्नी ही अभिनेत्री हॅजल कीच असून तिने सलमान खान, करिना कपूर यांच्या बॉडीगार्ड या चित्रपटात काम केले होते. युवराजने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर हॅजलने इन्स्टाग्रामवर एक भावुक पोस्ट लिहिली आहे. तिने युवराजने निवृत्तीची घोषणा केली त्या पत्रकार परिषदेचा फोटो पोस्ट करत त्यासोबत लिहिले आहे की, एका पर्वाचा अंत झाला. तुझी पत्नी असण्याचा मला अभिमान  आहे. आता आयुष्यातील एका नव्या पर्वाला सुरुवात करूया....

हॅजलची ही पोस्ट अनेकांनी लाईक केली आहे. तसेच यावर अनेकांनी कमेंट देखील केली आहे. या पोस्टवर युवराजची पूर्व प्रेयसी किम शर्माने देखील चक्क कमेंट केले आहे. तिने अशाचप्रकारे तुम्ही दोघे चमकत राहा... असे लिहिले आहे. 

मोहोब्बते या चित्रपटातील किम शर्मा सोबत युवराज सिंग जवळजवळ चार वर्षं नात्यात होता. पण या नात्याला युवराजच्या आईचा विरोध असल्याने त्यांनी ब्रेकअप केले असे म्हटले जाते.

मागील दोन वर्ष मर्यादित षटकांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या युवीला निवृत्तीचा निर्णय जाहीर करताना भावनांवर नियंत्रण ठेवणे जड जात होते. पत्रकारांशी संवाद साधताना त्याच्या आवाजातून हे जाणवत होते. पण, त्याने मनावर दगड ठेवून हा निर्णय जाहीर केला. युवराजचा निवृत्तीचा निर्णय तडकाफडकी नव्हता. निवृत्ती घेण्याचा निर्णय हा वर्षभरापूर्वीच घेण्याचा विचार केला होता, असे युवीने सांगितले. 

टॅग्स :युवराज सिंग