Join us  

युवीची पत्नी बनणार आमिर खानच्या लेकीच्या नाटकाची ‘हिरोईन’ !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 1:40 PM

‘बॉडीगार्ड’ या सिनेमामुळे चर्चेत आलेली मॉडेल आणि माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याची पत्नी हेजल किच दीर्घकाळापासून चित्रपटांपासून दूर आहे.

ठळक मुद्दे  हेजल किच हिने सलमान खानच्या गाजलेल्या ‘बॉडीगार्ड’ या   भूमिका साकारली होती.

‘बॉडीगार्ड’ या सिनेमामुळे चर्चेत आलेली मॉडेल आणि भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याची पत्नी हेजल किच दीर्घकाळापासून चित्रपटांपासून दूर आहे. चांगल्या  ऑफर मिळत नसल्याने मी अभिनयापासून लांब असल्याचे हेजलने अलीकडे सांगितले होते. पण कदाचित आता तिला मनासारखी  ऑफर मिळाली आहे. होय, आमिर खानची मुलगी इरा खान दिग्दर्शित एका नाटकामधून हेजल अ‍ॅक्टिंगच्या दुनियेत कमबॅक करणार आहे. इरा या नाटकाद्वारे दिग्दर्शनक्षेत्रात पाऊल ठेवतेय. ‘युरीपायडस मेडिया’ असे या नाटकाचे नाव आहे.

ताज्या मुलाखतीत हेजलने या वृत्ताला दुजोरा दिला. ‘अ‍ॅक्टिंग स्कूलमध्ये मी अभिनयाचे धडे घेतले आहेत. हे थिएटरशी बरेच मिळतेजुळेत आहे. त्यामुळे नाटकातून कमबॅक करणे हे माझ्यासाठी घरी परतण्यासारखे आहे. थिएटर माझे पहिले प्रेम आहे,’ असे हेजल म्हणाली.आमिरची मुलगी इरा खान हिच्यासोबत काम करण्याबद्दल ती म्हणाली, ‘इरा खूप तरूण आहे. पण इतक्या कमी वयातही तिच्यात कमालीची प्रगल्भता आहे. पात्रांचे गांभीर्य ती उत्तमरित्या समजते. इरामध्ये जबरदस्त आत्मविश्वास आहे.’

ती पुढे म्हणाली की, ‘एक कलाकार या नात्याने वेगवेगळ्या भूमिका करण्यात मला रस आहे. उत्तम कथा आणि मनासारख्या भूमिका करायला मला आवडेल. माझ्या कामासोबत मला कुठलीही तडजोड मान्य नाही.’

  हेजल किच हिने सलमान खानच्या गाजलेल्या ‘बॉडीगार्ड’ या   भूमिका साकारली होती. या सिनेमाव्यतिरिक्त ती ‘मॅक्सिम’ या सिनेमातील ‘आ आंटे अमलापूरम..’ या आयटम नंबरद्वारे प्रसिद्धीझोतात आली होती.  2016 मध्ये हेजलने युवराज सिंगशी लग्नगाठ बांधली. 30 नोव्हेंबर 2016 रोजी जालंधरच्या एका गुरुद्वारात हेजल कीच आणि युवराज सिंह यांचे हायप्रोफाइल लग्न झाले होते.  त्यानंतर गोव्यात हिंदू पद्धतीने पुन्हा एकदा त्यांचे लग्न झाले. 

टॅग्स :युवराज सिंगइरा खानआमिर खान