Join us  

दोन नव्हे तर अरमान मलिकने केलीयेत तीन लग्न; पत्नीने केली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 4:29 PM

अरमान मलिकने दोन नाही तर तीन लग्न केल्याचे समोर आले आहे.

युट्यूबर अरमान मलिक आणि त्याच्या दोन बायका यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. क्रितिका मलिक आणि पायल मलिक या त्याच्या दोन बायका. हे तिघंही युट्यूबर आहेत. आता हे कुटुंब पुन्हा चर्चेच आलं आहे. अरमान मलिकने दोन नाही तर तीन लग्न केल्याचे समोर आले आहे.

अरमानच्या दोन्ही पत्नींनी स्वत: त्यांच्या ताज्या व्लॉगमध्ये हे उघड केले आहे. त्यांनी म्हटले की, "अरमानने तीन लग्न केले आहेत. त्याने वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी पहिले लग्न केले होते, पण हे लग्न यशस्वी ठरले नाही आणि त्याचा घटस्फोट झाला" . 

 पायलने म्हटले की, "आमचे व्हिडिओ सर्व जण पाहतात. त्याही पाहत असतील. जर त्यांना काही अडचण असेल तर त्या  स्वतः समोर येतील". अरमान मलिकच्या पहिल्या पत्नीचे नाव सुमित्रा असून दोघांना दोन मुले आहेत.

अरमान मलिक एक प्रसिद्ध युट्यूबर आहे. त्याला फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. रिपोर्ट्सनुसार, अरमान मलिकने 2011 मध्ये पायलसोबत लग्न केले. त्यानंतर 2018 मध्ये पायलची बेस्ट फ्रेंड कृतिकासोबत लग्न केले.  हे सर्वजण एकाच घरात मोठ्या प्रेमानं, गुण्या गोविंदानं राहतात.

टॅग्स :बॉलिवूडयु ट्यूबअरमान मलिक