Join us  

Youtube vs TikTok : युट्यूबर कॅरी मिनाटीदेखील आहे टिकटॉकवर, फॉलोव्हर्समध्ये आमिर सिद्दीकीला टाकले मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 3:37 PM

फार कमी लोकांना माहित आहे की युट्यूबर कॅरी मिनाटीदेखील टिकटॉकवर असून त्याचा टिकटॉकवर फक्त एकच व्हिडिओ आहे. मात्र आमिर सिद्दीकीच्या तुलनेत तो टिकटॉकवरही आघाडीवर आहे.

लोकप्रिय भारतीय युट्यूबर कॅरी मिनाटी म्हणजेय अजय नागर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येतो आहे. या मागचं कारण म्हणजे त्याचा वादग्रस्त व्हिडिओ. त्याने युट्यूबवर युट्यूब व्हर्सेस टिकटॉक असा व्हिडिओ बनवला आणि हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आणि त्यानंतर तर कॅरी मिनाटी व टिक टॉक स्टार आमिर सिद्दीकीमध्ये महायुद्ध रंगले. मात्र फार कमी लोकांना माहित आहे की युट्यूबर कॅरी मिनाटीदेखील टिकटॉकवर असून त्याचा टिकटॉकवर फक्त एकच व्हिडिओ आहे. मात्र आमिर सिद्दीकीच्या तुलनेत तो टिकटॉकवरही आघाडीवर आहे.

 फार कमी लोकांना माहित असेल की युट्यूबर कॅरी मिनाटीदेखील टिकटॉकवर आहे.  त्याचे टिकटॉकवर 1.2 मिलियन फॉलोव्हर्स आहेत. त्याने फक्त एकच व्हिडिओ टाकला आहे आणि तोही गाढवाच्या ओरडण्याचा. त्याच्या या व्हिडिओला 18.7 मिलियन व्हुज आहेत आणि 1.5 मिलियन लाइक्स आहेत. त्याने हा व्हिडिओ अपलोड करून म्हटलंय की प्लीज सपोर्ट करा. खूप मेहनत लागली आहे हा व्हिडिओ बनवायला.

तर त्याच्या तुलनेत आमिर सिद्दीकीचे टिकटॉकवर खूप व्हिडिओ आहेत आणि 3.8 मिलियन फॉलोव्हर्स आहेत.  तसेच युट्यूबप्रमाणे टिकटॉकवरही कॅरी मिनाटीला सपोर्ट करणारे बरेच लोक आहेत. त्यामुळे त्याचा फटका टिक टॉकला बसला.

TikTok ची लोकप्रियता भारतात दिवसेंदिवस कमी होत असल्याचे पाहायला मिळते आहे. प्ले स्टोअरवर टिक-टॉकचे यूजर्स रेटिंग अचानक कमी झाले आहे. ज्या टिक-टॉकला 4.5 चे रेटिंग होते ते आता 1.2 वर आले आहे.

कालपर्यंत हे रेटिंग 1.3 होते. पण आज रेटिंग आणखी कमी झाले आहे. प्रत्येक दिवसाला हे रेटिंग आणखी कमी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. असेच राहिले तर टिक-टॉकचे रेटिंग लवकरच एक पेक्षा देखील कमी होईल अशी शक्यता वर्तण्यात येत आहे. प्ले स्टोरवरचे टिक-टॉकचे रेटिंग एक पेक्षा कमी झाल्यास याचा टिक-टॉकला भारतात मोठा धक्का बसेल यात काहीच शंका नाही. गेल्या काही दिवसांत अनेकांनी त्यांच्या मोबाईलमधून टिक-टॉक काढून टाकले आहे. यावरूनच टिक-टॉकचे भविष्य अंधारात आहे असा अंदाज आपण लावू शकतो.

टॅग्स :टिक-टॉकयु ट्यूब