Join us  

Youtube vs TikTok : युट्यूबशी घेतलेला पंगा आला अंगाशी, टिकटॉक भारतातून गाशा गुंडाळणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 1:03 PM

प्ले स्टोअरवर टिकटॉकचे यूजर्स रेटिंग अचानक कमी झाले आहे.

TikTok ची लोकप्रियता भारतात दिवसेंदिवस कमी होत असल्याचे पाहायला मिळते आहे. प्ले स्टोअरवर टिकटॉकचे यूजर्स रेटिंग अचानक कमी झाले आहे. . ज्या टिक टॉकला. 4.5 चे रेटिंग होते ते आता 1.3 वर आले आहे. यावरुन आपल्याला अंदाज येतोच आहे की भारतीय चाहत्यांनी ठरवले तर ते एका दिवसात कोणालाही स्टार करु शकतात आणि एका दिवसात त्या फ्लॉप. या वॉरमध्ये अनके जणांनी आपला सपोर्ट युट्यूबला देत टिक टॉकला अॅपला डिलीट केले होते.  बर्‍याच इंटरनेट युजर्सनी व्हर्च्युअल वॉरमध्ये सामिल होत टीकॉकवरच हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले. यूट्यूब आणि टिकटॅाक यांच्यात कोण चांगले आहे यावरून गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर कोल्ड वॉर पाहायला मिळत आहे.

या वॉरची सुरुवात आमिर सिद्दीकी या लोकप्रिय टिक टॉकरच्या व्हिडीओने झाली. आमिरने युट्यूबर्सची खिल्ली उडवणारा व्हिडीओ शेअर केला होता. मग काय, दिग्गज युट्यूबर कॅरी मिनाटीने आमिरला त्याच्याच भाषेत उत्तर देत ‘रोस्ट’ केले होते. कॅरीचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. मात्र तो व्हिडीओ मापदंडाविरोधी असल्याचे सांगत युट्यूबने तो हटवला. त्यानंतर कॅरी मिनाटीने आणखी एका व्हिडिीओ युट्यूबरवर शेअर केले आहेत. तो ही तूफान व्हायरल झाला. 

टिक टॉकस्टार फैजल  सिद्दीकीने मुलींवरच्या अ‍ॅसिड हल्ल्याचे उदात्तीकरण करतानाच व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओची दखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी म्हटले आहे. रेखा यांनी महाराष्ट्राच्या डीजीपींना पत्र लिहून फैजलविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :टिक-टॉकयु ट्यूब