Join us  

जेव्हा किंग खान शाहरुखला सरोज खान यांनी लगावली होती कानशिलात, हे होते कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2020 12:54 PM

सरोज खान यांनी जवळपास 40 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी दोनशेहून अधिक सिनेमांसाठी, दोन हजारांपेक्षा जास्त गाणी त्यांनी कोरिओग्राफ केली होती. हवा हवाई, तम्मा तम्मा, एक दोन तीन, धक धक करने लगा, डोला रे डोला यासारख्या गाजलेल्या गाण्यांची कोरिओग्राफी त्यांनी केली होती.

सरोज खानच्या निधनाने बॉलिवूडमध्ये शोककुल वातावरण पसरले आहे.  चित्रपटसृष्टीत त्यांनी दिलेल्या आपल्या योगदानाबद्दल त्यांना नेहमीच स्मरणात ठेवले जाईल.सरोज यांनी  'मास्टरजी' म्हणून ओळखले जायचे. इंडस्ट्रीमध्ये त्यांचे एक वेगळेच स्थान होते. सारेच  त्यांचा मोठा आदर करतात.शाहरूखने दिलेल्या एका मुलाखतीत सरोज यांच्या बाबतीतला एक किस्सा सांगितला होता. आजही तो रसिकांच्या चांगलाच लक्षात आहे.  

शाहरुखने एका न्यूज पोर्टलला दिलेल्या जुन्या मुलाखतीत या संपूर्ण घटनेचा उल्लेख केला होता. शाहरुखने सांगितले होते की, तो सुरुवातीच्या काळात सरोज खानसोबत काम करत होता.

 

त्यावेळी त्यांना 3 शिफ्टमध्ये काम करावे लागायचे. सतत कामात बिझी असल्यामुळे काम करून कंटाळाही आला असल्याचे त्याने सांगितले.

शाहरूख खानचा आळस पाहून प्रेमाने  सरोज खान यांनी शाहरूखच्या गालावर एक चापट मारली होती. त्यावेळी शाहरूखची समजूत काढत त्यांनी सांगितले होते की, काम खूप आहे असे कधीही म्हणू नये, मिळालेल्या कामाचा आदर करत ते सर्वश्रेष्ठ कसे होईल यावर मेहनत करावी असा सल्लाही दिला होता. 

गेल्या वर्षी सरोज खान यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, बॉलिवूडमध्ये काम करणे थांबवले आहे. सुरूवातीचे दिवस खूप आठवतात. जेव्हा माझ्याकडे खूप काम होते.पण आता काम मिळणेही बंदच झाले असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यावेळी सलमान खान त्यांच्या मदतीला आला धावून आला होता आणि त्याने काम देण्याचे आश्वासनही दिले होते. सरोज खानने बॉलिवूडमधील जवळपास सर्व मोठ्या सेलिब्रिटींसबरोबर काम केले आहे.

जवळपास 40 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी दोनशेहून अधिक सिनेमांसाठी, दोन हजारांपेक्षा जास्त गाणी त्यांनी कोरिओग्राफ केली होती. हवा हवाई, तम्मा तम्मा, एक दोन तीन, धक धक करने लगा, डोला रे डोला यासारख्या गाजलेल्या गाण्यांची कोरिओग्राफी त्यांनी केली होती. माधुरी दीक्षितवर चित्रीत केलेले ‘कलंक’ सिनेमातील ‘तबाह हो गये’ हे त्यांनी कोरिओग्राफ केलेले शेवटचे गाणे ठरले.

 

टॅग्स :सरोज खानशाहरुख खान