Join us  

संजय दत्तचे वैवाहिक आयुष्यही राहिले वादात, मान्यता दत्त आधी इतक्या वेळा केले आहे लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 11:55 AM

संजय दत्त तिस-यांदा प्रेमात पडला. पाहता क्षणीच तो तिच्या प्रेमात पडला होता. ती मुलगी होती मान्यता. गोवामध्ये दोघांनी लग्न केले. २१ ऑक्टोबर २०१० मध्ये संजयला दोन जुळे मुले झाली. एकाचे नाव शहरान आणि दुसऱ्याचे नाव इकरा असे आहे.

बॉलीवुडचा मुन्नाभाई अर्थात संजय दत्तचे फिल्मी करिअरपेत्रा खाजगी आयुष्यच सर्वाधिक चर्चेत राहिले. त्याच्या अफेअर पासून ते वैवाहिक आयुष्यदेखील चांगले वादग्रस्त राहिले. संजय दत्तची मान्यता ही तिसरी पत्नी आहे. दोघांमध्ये खूप चांगले बॉन्डींग आणि रोमँटीक केमिस्ट्री पाहायला मिळते. सोशल मीडियावर दोघांचे फोटो पाहून तुम्हालाही त्या गोष्टीचा अंदाज येईल. मान्यत संजय दत्तच्या खूप चांगली काळजी घेते. त्याच्या प्रत्येक अडचणीत तिच त्याला आधार देते. मान्यताचेही संजय दत्त आधी लग्न झाले होते. मान्यताही घटस्फोटीत असून मान्यताला बघताच क्षणी संजय दत्त तिच्यावर फिदा झाला होता. दोघांमध्ये १९वर्षाचा फरक आहे. दोघांच्या वयात इतके मोठे अंतर असूनही दोघांचा संसार सुरळीत सुरू आहे. 

संजय दत्तची पहिले लग्न १९८७ मध्ये ऋचा शर्मा बरोबर केले होते. या दोघांना एक मुलगी झाली जिचे नाव आहे त्रिशाला दत्त. मध्यंतरी त्रिशलाने तिच्या आईसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमध्ये रिचा शर्मा खूपच सुंदर दिसत आहे. विशेष म्हणजे या फोटोवर संजय दत्तची बहीण आणि पत्नी मान्यता दत्तनं सुद्धा कमेंट केली होती. त्रिशला संजय दत्तसह राहत नसून अमेरिकेत राहते. त्रिशाला दत्त बॉलिवूडच्या प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक असली तरीही ती लाइम लाइटपासून दूर राहणेच पसंत करते.

संजय दत्तच्या जीवनात सगळे चांगले सुरु असताना १९९६ मध्ये ऋचाला  ब्रेन ट्युमर झाला, त्यात तिचा मृत्यू झाला. यानंतर संजयने १९९८ मध्ये रिया पिल्लइबरोबर दुसरे लग्न केले. संजय दत्तने रियावर जीवापाड प्रेम केले. मात्र या दोघांचे नाते पाहिजे तितके घट्ट नव्हते. काही वर्षानंतरच दोघांचा घटस्फोट झाला २००५ मध्ये दोघेजण वेगळे झाले. रियाने नंतर  लिएण्डर पेस सोबत लग्न केले केले या दोघांना एक मुलगीही झाली. मात्र रियाचे हे लग्नही फार काळ टिकले नाही. रियाने लिएण्डरलाही घटस्फोट दिला आणि त्यापासूनही वेगळी झाली. 

संजय दत्त तिस-यांदा प्रेमात पडला. पाहता क्षणीच तो तिच्या प्रेमात पडला होता. ती मुलगी होती मान्यता. गोवामध्ये दोघांनी लग्न केले. २१ ऑक्टोबर २०१० मध्ये संजयला दोन जुळे मुले झाली. एकाचे नाव शहरान आणि दुसऱ्याचे नाव इकरा असे आहे.

काही दिवसांपूर्वीच मान्यता एक पोस्ट शेअर करत लिहिले होते की, 'कधी कधी आपल्याला गप्प बसावं लागतं, कारण कोणतेही शब्द हे व्यक्त करू शकत नाहीत की, तुमच्या डोक्यात आणि मनात काय सुरू आहे'. संजय दत्तला कॅन्सरचं निदान झाल्यावर मान्यताने स्टेटमेंट जारी केलं होतं. त्यात ती म्हणाली होती की, 'माझी संजूच्या फॅन्सना विनंती आहे की, त्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नये. माझी इच्छा आहे की, सर्वांनी सपोर्ट आणि प्रेम करत रहा'.

टॅग्स :संजय दत्त