Join us
Daily Top 2Weekly Top 5

WEDDING Anniversary:प्रियंकाच्या लग्नामुळे उमेद भवनची तीन महिन्यांची झाली होती कमाई, आकडा वाचून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2020 14:13 IST

पाहुण्यांच्या खास आवडी-निवडीचाही येथे विचार करण्यात आला होता.पाहुणाचारातही कुठेही कमी राहू नये म्हणून निकने खास कुवेत आणि दुबई येथील त्याच्या शेफना बोलावले होते.

ट्रेंडिंग कपल प्रियंका चोप्रा आणि निक जोनास लग्न बंधनात अडकल्यापासून दोघांना एकमेकांसाठी वेळ देताना कसरत करावी लागत आहे. मात्र लॉकडाऊन काळात दोघांनाही लग्नानंतर पहिल्यांदाच इतका वेळ एकमेकांसोबत घालवायला मिळत आहे. त्यांच्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. 

प्रियंका आणि निकचं शुभमंगल जोधपूरच्या उमेद भवन इथे पार पडले होते. प्रियंका-निकच्या लग्नात दीड ते दोन हजार पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते. दोन पद्धतीने हे पार होते. आलिशान पार पडलेले हे लग्नही तितकेच महागडे होते. मुळात उमेद भवनचे एका दिवसाचे भाडे वाचून भल्या भल्यांना भोवळ येईल.

लग्नातला प्रत्येक क्षण प्रियंकाला संस्मरणीय करायचा होता. त्यामुळे तिच्या लग्नात कसलीही कसर तिने बाकी ठेवली नव्हती. हे लग्न इतके रॉयल होते की, या एकाच लग्नातून उमेद भवन हॉटेलची तीन महिन्यांची कमाई झाली. होय, इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुनीत चटवाल यांनी स्वत: ही माहिती दिली होती. प्रियंका व निकचे लग्न 2018 मधील सर्वाधिक चर्चित लग्न होते.

मीडिया रिपोर्टनुसार प्रियंका-निकने  ४ दिवसांसाठी उम्मेद भवन बुक करण्यासाठी 3.3 कोटी रुपये दिले होते. एका अमेरिकन वेबसाइटनुसार या लग्नात 4 कोटींपेक्षा जास्त रुपये खर्च करण्यात आले होते. प्रियंका-निकच्या ख्रिश्चन वेडिंगमध्ये 18 फूट उंच केक बनविण्यात आला होता. जेव्हा या केकचा फोटो समोर आला तेव्हा सारेच आश्चर्यचकित झाले होते.

पाहुण्यांच्या खास आवडी-निवडीचाही येथे विचार करण्यात आला होता.पाहुणाचारातही कुठेही कमी राहू नये म्हणून निकने खास कुवेत आणि दुबई येथील त्याच्या शेफना बोलावले होते.त्याच शेफने हे केकही बनवले होते. लग्नात, ताज हॉटेलच्या 50 हून अधिक शेफना पाहुण्यांना स्वादिष्ट पदार्थ बनविण्याची जबाबदारी देण्यात आली होती.

ख्रिश्चन पद्धतीने आणि  हिंदू परंपरेनुसार पार पडलेल्या या लग्नात प्रियंका-निकने खूप महाग आणि डिझायनर ड्रेस परिधान केले होते. निक जोनासने संगीत सोहळ्यात आंतरराष्ट्रीय आणि बॉलीवुडच्या गाण्यावर थिरकताना पाहून सारेच खुश झाले होते.

''गल्ला गुडियँ'' आणि ''पिंगा'' या गाण्यावर तो थिरकताना पाहून सारचे त्याच्यावर फिदा झाले होते. यावेळी  प्रियंका आणि निक दोघांनीही एकत्र खास परफॉर्मन्स देत वाहवा मिळवली होती.

टॅग्स :प्रियांका चोप्रा आणि निक जोनास