Join us  

आमिर खानची हिरोइन आता दिसते अशी, तुम्हीही म्हणाल हीच का ती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 7:00 AM

ग्रेसीलाही मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसह काम करायला संधी मिळाली. लगान या सिनेमात तिनं साकारलेली गौरी भुवन इतकीच रसिकांना भावली.

१९९७ साली 'अमानत' मालिकेतून तिनं छोट्या पडद्यावर एंट्री मारली होती. या मालिकेत काम करत असतानाच तिने लगान सिनेमासाठी स्क्रीन टेस्ट दिली आणि तिची लगानसाठी निवड झाली. ती अभिनेत्री होती ग्रेसी सिंग. त्यानंतर ती सिनेमांमध्ये रमली. मात्र आता ग्रेसीला सिनेमात काम मिळेना. त्यामुळे  तिला छोट्या पडद्याचा आधार घ्यावा लागला. तब्बल १३ वर्षांनंतर ग्रेसीने छोट्या पडद्यावर कमबॅक केलं. 'संतोषी माता' मालिकेत तिने देवीची भूमिका साकारली. आपल्याला टिपिकल सासू-सूनांच्या भांडणावर आधारित मालिकांमध्ये रस नसल्याचे तिने स्पष्ट केले  होते. त्यामुळे ग्रेसी आता छोट्या पडद्यावरच रमल्याचं पाहायला मिळतंय. 

बॉलीवुडच्या सलमान, शाहरुख आणि आमिर या खान त्रयींसह काम करायला मिळावं अशी प्रत्येक अभिनेत्रीची इच्छा असते. त्यापैकी मोजक्या अभिनेत्री अशा असतात ज्यांना आपल्या पहिल्याच सिनेमात या खान बंधूंसह काम करण्याची संधी मिळते. ग्रेसीलाही  मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसह काम करायला संधी मिळाली. 'लगान' या सिनेमात तिनं साकारलेली गौरी भुवन ही भूमिका इतकीच रसिकांना भावली. 

 

आशुतोष गोवारीकर यांच्या 'लगान' या सिनेमाने ऑस्करपर्यंत मजल मारली होती. त्यामुळंच भुवन आणि सिनेमातील इतर कलाकारांप्रमाणे गौरीसुद्धा रसिकांच्या मनात घर करुन गेली. लगानमुळे गौरी साकारणा-या ग्रेसी सिंगचं करियर पालटलं होतं. अजय देवगणसह 'गंगाजल' आणि संजय दत्तसह 'मुन्नाभाई एमबीबीएस' या सिनेमात ग्रेसीने काम केलं हे दोन्ही सिनेमा सुपरहिट ठरले होते. सोबतच ग्रेसीने साकारलेल्या भूमिकाही तितक्याच हिट आणि लक्षवेधी ठरल्या. याशिवाय तिने अनिल कपूर आणि प्रिती झिंटा स्टारर 'अरमान' या सिनेमात काम केलं होतं. मात्र या निवडक सिनेमांनंतर ग्रेसीच्या सिने करिअरची गाडी रुळावरुन घसरली. एकामागून एक तिचे सिनेमा फ्लॉप झाले. तिला सिनेमात काम मिळणं कठीण झालं. मात्र करिअर सुरु ठेवण्यासाठी आणि पैसा कमावण्याकरिता तिने आपला मोर्चा रुपेरी पडद्यावरुन छोट्या पडद्याकडे वळवला.

ग्रेसीसाठी छोट्या पडद्यावर काम करणं तसंही काही नवी नाही. तिने आपल्या अभिनयाच्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासूनच केली होती. २० जुलै १९८० रोजी नवी दिल्लीत ग्रेसीचा जन्म झाला. तिचे वडिल स्वर्ण सिंग खासगी कंपनीत नोकरीला तर आई शिक्षिका होती. लेकीने इंजीनिअर व्हावे अशी तिच्या वडिलांची इच्छा होती. मात्र अपघाताने ग्रेसी मॉडेलिंग क्षेत्राकडे वळली. छोट्या पडद्यापासून सुरु झालेला ग्रेसीचा प्रवास रुपेरी पडदा आणि मग पुन्हा रुपेरी पडद्यावरुन ती छोट्या पडद्याकडे परतली आहे. 

टॅग्स :ग्रेसी सिंगआमिर खान