Join us  

VIDEO : यो यो हनी सिंहचं नवं गाणं First Kiss रिलीज, काही मिनिटांमध्येच मिळाले दीड लाख व्ह्यूज....

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2020 2:54 PM

यो यो हनी सिंहच्या या पार्टी सॉंगबाबत त्याच्या फॅन्समध्ये मोठा उत्साह सुद्धा बघायला मिळतो आहे. गाणं रिलीज होताच काही मिनिटांमध्येच एक लाख व्ह्यूज मिळाले आहेत.

पंजाबी आणि बॉलिवूडचा प्रसिद्ध सिंगर यो यो हनी सिंह याचं नवं गाणं 'फर्स्ट किस' रिलीज झालं आहे. या गाण्यात त्याच्यासोबत इप्सिता मुख्य भूमिकेत दिसत आहे. हनी सिंगच्या नव्या गाण्याने रिलीज होताच यूट्यूबवर धमाका केलाय. यो यो हनी सिंहच्या या पार्टी सॉंगबाबत त्याच्या फॅन्समध्ये मोठा उत्साह सुद्धा बघायला मिळतो आहे. गाणं रिलीज होताच काही मिनिटांमध्येच एक लाख व्ह्यूज मिळाले आहेत.

'फर्स्ट किस' या गाण्याला हनी सिंहने आपला आवाज दिला आहे. सोबतच गाणं लिल गोली, होमी दिल्लीवाला, सिंघस्टा आणि यो यो हनी सिंहने लिहिलं आहे. फर्स्ट किस गाण्याताली इप्सिताचा अंदाजही फॅन्सना चांगलाच भावला आहे. लोक भरभरून या गाण्यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

याआधी हनी सिंहचं 'केअर नी करदा' हे जबरदस्त गाणं रिलीज झालं होतं. छलांग सिनेमातील गाणं 'केअर नी करदा' मध्ये हनी सिंहचा रॅपही ऐकायला मिळाला. त्याच्या या रॅपने सोशल मीडियावरही धमाल केली होती. हा रॅप यो यो हनी सिंहसोबतच अल्फाज आणि होमी दिलवाला यांनी लिहिलं होतं. हनी सिंहचं हे नवं गाणंही सुपरहिट ठरेल हे यात काही शंका नाही. 

टॅग्स :हनी सिंहसोशल व्हायरल