Join us  

​जी हां जनाब मैं अस्पताल जाता हूँ...! रूग्णालयातून परतल्यावर अमिताभ बच्चन यांनी लिहिली कविता!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2018 5:05 AM

बिग बी अमिताभ बच्चन यांना रूटीन चेकअपसाठी मुंबईच्या लीलावती रूग्णालयात भरती करण्यात आले होते. रूटीन चेकअपनंतर काल त्यांना रूग्णालयातून ...

बिग बी अमिताभ बच्चन यांना रूटीन चेकअपसाठी मुंबईच्या लीलावती रूग्णालयात भरती करण्यात आले होते. रूटीन चेकअपनंतर काल त्यांना रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली. प्राप्त माहितीनुसार, मानदुखी आणि पाठदुखीनंतर त्यांना रूग्णालयात भरती करण्यात आले होते. अमिताभ रूग्णालयात भरती झाल्याची बातमी येताच, त्यांच्या चाहत्यांमध्ये निराशा पसरली होती. पण काही नियमित वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर अमिताभ काल घरी परतले आणि घरी परतताच पुन्हा एकदा अ‍ॅक्टिव्ह झालेत.लीलावतीतून सुट्टी मिळताच बिग बीने आपल्या चाहत्यांसाठी एक कविता लिहिली. या कवितेत अमिताभ यांनी रूग्णालयातील आपले अनुभव मांडले आहेत. ही कविता आपण खाली वाचू शकता...जी हां जनाब मैं अस्पताल जाता हूँबचपन से ही इस प्रतिक्रिया को जीवित रखता हूँ ,वहीं तो हुई थी मेरी प्रथम पयदाइशि चीत कारवहीं तो हुआ था अविरल जीवन का मेरा स्वीकारइस पवित्र स्थल का अभिनंदन करता हूँ मैंजहाँ इस्वर बनाई प्रतिमा की जाँच होती है तयधन्य है वे ,धन्य हैं वे...आम्ही सांगू इच्छितो की, सध्या अमिताभ अगदी स्वस्थ आहेत. खुद्द अमिताभ यांनीही घाबरण्यासारखे काहीच नसल्याचे म्हटले आहे. अमिताभ  गेल्या काही दिवसांपासून घशातील संसर्ग, मानदुखी व पाठदुखीमुळे बेजार असल्याचे कळतेय. गतवर्षी ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर घशातील संसर्गामुळे त्यांची प्रकृती अचानक बिघडली होती. अमिताभ बच्चन यांच्या घशाला सूज आली होती. ही सूज इतकी होती की, बिग बी यांना खाणे पिणे तर दूर साधे पाणी पिणेही कठीण झाले होते. त्यांच्या तोंडून शब्दही फुटेना म्हटल्यावर ऐनवेळी ‘कौन बनेगा करोडपती’चे शूटींग रद्द करण्यात आले होते. तूर्तास अमिताभ बच्चन अनेक चित्रपटांच्या शूटींगमध्ये व्यस्त आहेत.  ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान,’‘100 नॉट आऊट’, ‘ब्रह्मास्त्र’ असे अनेक चित्रपट त्यांच्याकडे आहेत.ALSO READ : 102 Not Out Teaser : अमिताभ बच्चन बनणार आपल्या मुलाला वृद्धाश्रमात पाठविणारे पहिले वडील!