Join us  

एवलिन शर्माच्या घरी 'लक्ष्मी'चं आगमन; पहिल्यांदाच शेअर केला बाळाचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 12:24 PM

Evelyn sharma: काही दिवसांपूर्वी एवलिनने आई होणार असल्याची माहिती दिली होती. विशेष म्हणजे आता एवलिनने एका गोड मुलीला जन्म दिला आहे.

'ये जवानी है दिवानी' (Yeh Jawaani Hai Deewani)  या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री एवलिन शर्मा (Evelyn Sharma) नुकतीच आई झाली आहे. एवलिनने एका चिमुकलीला जन्म दिला आहे. अलिकडेच तिने इन्स्टावर बाळासोबत एक गोड फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

१५ मे २०१९  रोजी एवलिनने तुशान भिंडीसोबत लग्न केलं असून तो ऑस्ट्रेलियात स्थायिक आहे. तुशान एक डॉक्टर आहे. विशेष म्हणजे एवलिनने तिच्या लग्नाची माहितीदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातूनच दिली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी तिने आई होणार असल्याची माहिती दिली होती. विशेष म्हणजे आता एवलिन आई झाली आहे.

'माझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या भूमिकेत', असं कॅप्शन देत एव्हलिनने तिच्या बाळासोबतचा फोटो इन्स्टावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये एवलिनने तिच्या बाळाला हृदयाशी कवटाळून छान मिठीत घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान,  एवलिन व तुशान यांचं लव्ह मॅरेज असून त्यांची पहिली भेट 2018 मध्ये झाली होती. दोघेही एका ब्लाइंट डेटवर एकमेकांना भेटले होते. दोघांच्या मित्रांनी ही ब्लाइंड डेट अरेंज केली होती. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि 2019 मध्ये सिडनीच्या हार्बर ब्रीजवर गुडघ्यावर बसून तुशानने एवलिनला प्रपोज केले.

 

टॅग्स :एवलिन शर्मासेलिब्रिटीबॉलिवूड