Join us  

राजकुमार रावचा हा असणार यावर्षीचा पहिला चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 6:00 AM

यावर्षीच्या सुरूवातीला राजकुमार राव 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ठळक मुद्दे'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' चित्रपटात दिसणार राजकुमार राव व सोनम कपूर'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' चित्रपट होणार १ फेब्रुवारीला प्रदर्शित

अभिनेता राजकुमार रावने विविध भूमिका सक्षमपणे साकारून रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. राजकुमार रावसोनम कपूर अभिनीत 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' चित्रपटाच्या घोषणेनंतर एका चर्चेला उधाण आले आहे. ही चर्चा म्हणजे २०१९मध्ये राजकुमार रावचा हा पहिला चित्रपट आहे. 

मागील वर्षी राजकुमार रावचा 'स्त्री' चित्रपट प्रदर्शित झाला आणि या वर्षाच्या सुरूवातीला 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी तो सज्ज झाला आहे. या चित्रपटात सोनम कपूर व राजकुमार राव मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हे दोघे पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. या चित्रपटातील टायटल ट्रॅक एक लडकी को देखा तो ऐसा लगा आणि इश्क मीठा या गाण्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या चित्रपटात अनिल कपूर सोनमच्या वडीलांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अनिल कपूरचे एक लडकी को देखा तो ऐसा लगा हे गाणे तब्बल २४ वर्षानंतर रिक्रिएट करण्यात आले आहे. त्यामुळे अनिल कपूर खूप उत्सुक आहेत आणि त्यांचे हे आवडते गाणे आहे.

'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' चित्रपटात फक्त जुन्या काळातील रोमांस पाहायला मिळणार नाही तर आताच्या काळातील प्रेमकथेचा टच देखील पाहायला मिळणार आहे. या सिनेमातून तुम्हाला दुसऱ्यांच्या लव इंटरेस्टबाबत निर्णय घेण्याचा हक्क नाही, याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' चित्रपटात अनिल कपूर, सोनम कपूर, राजकुमार राव व जुही चावला हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. फॉक्स स्टार स्टुडिओ प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती विधु विनोद चोप्रा व राजकुमार हिराणी यांनी केली आहे. शैली चोप्रा दिग्दर्शित हा सिनेमा १ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :राजकुमार रावएक लडकी को देखा तो ऐसा लगासोनम कपूर