‘यारियां’ फेम अभिनेत्री म्हणते, बोल्ड सीन्ससाठी ‘ऑलवेज रेडी’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2017 17:03 IST
‘यारियां’ चित्रपटातील अभिनेत्री रकुलप्रीत सिंग सध्या तिच्या बोल्ड स्टेटमेंटमुळे चर्चेत आहे. एका मुलाखतीदरम्यान रकुलप्रीतने असे काही स्टेटमेंट दिले की, ...
‘यारियां’ फेम अभिनेत्री म्हणते, बोल्ड सीन्ससाठी ‘ऑलवेज रेडी’!
‘यारियां’ चित्रपटातील अभिनेत्री रकुलप्रीत सिंग सध्या तिच्या बोल्ड स्टेटमेंटमुळे चर्चेत आहे. एका मुलाखतीदरम्यान रकुलप्रीतने असे काही स्टेटमेंट दिले की, सर्वच दंग राहिले. रकुलप्रीतला जेव्हा चित्रपटातील किसिंग सीनविषयी विचारण्यात आले तेव्हा तिने फारसा वेळ न घेता या प्रश्नाचे उत्तर दिले. ती म्हणाली की, पडद्यावर मला बोल्ड अथवा किसिंग सीन्स देण्यात काहीच अडचण वाटत नाही. जर हे सीन्स चित्रपटाच्या कथेची डिमांड असतील तर त्यासाठी मी सदैैव तयार असते. रकुलप्रीतने २०१४ मध्ये आलेल्या ‘यारियां’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. मागील तीन वर्षांपासून तिने एकाही चित्रपटात काम केले नाही. रकुलने म्हटले की, तिला पडद्यावर ग्लॅमरस् लुकमध्ये दाखविण्यात काहीच अवघड वाटत नाही. उलट ग्लॅमर हा इंडस्ट्रीचा महत्त्वाचा भाग असल्याचे ती म्हणते. खरं तर चाहत्यांनाच आपल्या आवडत्या कलाकारांना ग्लॅमरस् आणि बोल्ड अंदाजात बघायला आवडते. त्यामुळे मी अशाप्रकारचे बोल्ड सीन्स देण्यास कधीच नकार दिला नाही व देणारही नाही, असेही रकुलने रोखठोकपणे सांगितले. २०१४ मध्ये रकुलप्रीत हिने तिचा सह-अभिनेता हिमांश कोहली याच्यासोबत लिपलॉक सीन दिला होता. चित्रपटातील तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुकही झाले होते. या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर चांगली मजल मारली होती. तरुणांना चित्रपट चांगलाच भावला होता. असो रकुलप्रित हिच्याविषयी सांगायचे झाल्यास, २००९ मध्ये तिने ‘गिल्ली’ या कन्नड चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. रकुलने या चित्रपटात करिअर करण्यासाठी नव्हे तर पॉकिटमनी मिळावा म्हणून काम केले होते. तिला अजिबात माहिती नव्हते की, हा चित्रपट जबरदस्त हिट होणार असून, यामुळे तिच्या करिअरला ब्रेक मिळणार आहे. पुढे तिने २०१४ मध्ये आलेल्या ‘यारियां’मधून बॉलिवूड डेब्यू केला. याव्यतिरिक्त रकुलने ‘वेंकटाद्री एक्स्प्रेस’ (२०१३), ‘पुथागम’ (२०१३), ‘सरायनोडू’ (२०१६), ‘ननक्कु प्रेमाथो’ (२०१६) आणि ‘ध्रुव’ या साउथ चित्रपटांमध्ये काम केले आहे. आजही तिला साउथमध्ये अनेक चित्रपटांच्या आॅफर्स येत आहेत. त्याव्यतिरिक्त ती लवकरच ‘शिमला मिर्च’ या बॉलिवूड चित्रपटामध्येही बघावयास मिळणार आहे. दरम्यान, रकुलला चित्रपटांव्यतिरिक्त फिटनेसविषयी अधिक प्रेम आहे. यासाठी तिने २० फेब्रुवारी २०१६ मध्ये हैदराबाद येथील गाचीबोवली येथे एक जिम सुरू केली आहे. या जिमचे नाव ‘एफ ४५’ असे ठेवले आहे. सध्या तिचा भाऊ जिम सांभाळतो. या व्यतिरिक्त रकुलने हैदराबाद येथीलच एका प्रतिष्ठित परिसरात ‘जुबली हिल्स’मध्ये एक नवे अपार्टमेंट खरेदी केले आहे. ज्याची किंमत तीन कोटी रुपये आहे. तीन बेडरूम असलेले हे घर १६ हजार स्केअर फुट आहे. रकुल याठिकाणी तिच्या आई-वडिलांसमवेत राहते. रकुलला बॉलिवूडमध्ये स्थिर व्हायचे असून, ती एका बड्या बॅनरच्या चित्रपटाच्या शोधात आहे.