यामी ‘टँगो’साठी करतेय प्रचंड मेहनत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2016 14:42 IST
हृतिक रोशन आणि यामी गौतम ही क्यूट जोडी प्रथमच ‘काबिल’ या आगामी चित्रपटात एकत्र दिसणार आहे. तुम्हाला हे माहितीये ...
यामी ‘टँगो’साठी करतेय प्रचंड मेहनत!
हृतिक रोशन आणि यामी गौतम ही क्यूट जोडी प्रथमच ‘काबिल’ या आगामी चित्रपटात एकत्र दिसणार आहे. तुम्हाला हे माहितीये का? यामी या चित्रपटातील एका रोमँटिक ट्रॅकसाठी हृतिकसोबत ‘टँगो’ या डान्सस्टाईलसाठी प्रचंड मेहनत घेत आहे. अत्यंत कठीण असणारा हा डान्सप्रकार प्रथमच या चित्रपटात दिसणार आहे. तिचे डान्समुव्ह्ज उत्तम जमण्यासाठी खास ट्रेनिंगही यामाध्यमातून घेत असल्याचे कळते आहे. तिचा अनुभव शेअर करताना ती म्हणते,‘मी गेल्या दोन आठवड्यांपासून या डान्सस्टाईलवर मेहनत घेत आहे. मला या रोमँटिक ट्रॅकदरम्यान पिआनो वाजवायचा असून टँगो हा डान्सही सादर करावयाचा आहे. हा डान्सप्रकाराचा प्रत्येक क्षण मी एन्जॉय के ला.’ दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना कितपत आवडते हे लवकरच कळेल. यात हृतिक रोशन अंध व्यक्तीची भूमिका करणार असून यामी त्याच्या प्रेयसीच्या भूमिकेत दिसणार आहे.