Join us

अमितजींसोबतचा कामाचा अनुभव सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2016 16:06 IST

अभिनेत्री कीर्ती कुल्हारीच्या अनुसार अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणे, ही तिच्यासाठी अभिमानाची बाब आहे. बिग बी सोबत काम करणे ...

अभिनेत्री कीर्ती कुल्हारीच्या अनुसार अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणे, ही तिच्यासाठी अभिमानाची बाब आहे. बिग बी सोबत काम करणे हा सुंदर अनुभव असल्याचे तिने म्हटले आहे.‘खूप छान अनुभव. मी खूप भाग्यवान आहे. त्यांच्यासोबत काम करण्याचा आनंद काही औरच आहे. सेटवर ते अत्यंत व्यावसायिक असतात. काम करताना जराही दडपण जाणवत नाही’, असे कीर्तीने सांगितले.पिकुचे दिग्दर्शक शुजीत सरकार यांनी निर्माण केलेला आणि अनिरुद्ध रॉय चौधरी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘पिंक’ या चित्रपटात तापसी पन्नू आणि के के मेनन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सॅन ७५ च्या ट्रेलर लाँचप्रसंगी ती बोलत होती.