Join us

अदा इशासोबत कमांडो २ मध्ये काम करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2016 16:51 IST

अभिनेत्री अदा शर्मा हिच्या अनुसार ती इशा गुप्तासोबत कमांडो २ मध्ये काम करणार आहे. सध्या तरी मी विद्युतसोबत काही ...

अभिनेत्री अदा शर्मा हिच्या अनुसार ती इशा गुप्तासोबत कमांडो २ मध्ये काम करणार आहे. सध्या तरी मी विद्युतसोबत काही शॉटस् केले आहे. इशासोबतही काम करण्याची मला अपेक्षा असल्याचे अदा म्हणाली.विपुल अमृतलाल शाह हे निर्माते आहेत. विपुल यांच्या अनुसार कमांडो चित्रपटात विद्युतने केलेल्या कामामुळे, तसेच त्याच्या रोमँटिक भूमिकेमुळे तो दोन अभिनेत्रींसमवेत काम करतो आहे.‘चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात झाली आहे. मुंबईमध्ये २४ ते २५ दिवसांचे शुटींग पूर्ण झाले आहे. आता मलेशिया येथे उर्वरित शुटींग होणार आहे. त्याशिवाय काही अ‍ॅक्शन सिक्वेन्ससाठीही ट्रेनिंग होईल’ असे अदाने सांगितले.अदाने यापूर्वी १९२०, हसी तो फसी या चित्रपटात काम केले आहे. रणबीर कपूर-कटरिना कैफ यांच्या जग्गा जासूसमध्येही ती दिसेल.