Join us  

प्रियंका चोप्रा व निक जोनासने घेतला Snowfallचा आनंद, पाहा फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2019 12:56 PM

प्रियंका चोप्रा व निक जोनास यांच्या लग्नाला दोन महिने झालेत. पण अद्यापही दोघांचे व्हॅकेशन आणि हनीमून संपलेले नाही. तूर्तास प्रियंका व निकचे ताजे फोटो सोशल मीडियावर धूम करत आहेत.

प्रियंका चोप्रानिक जोनास यांच्या लग्नाला दोन महिने झालेत. पण अद्यापही दोघांचे व्हॅकेशन आणि हनीमून संपलेले नाही. तूर्तास प्रियंका व निकचे ताजे फोटो सोशल मीडियावर धूम करत आहेत.  यात दोघेही कॅलिफोर्नियाच्या बर्फाच्छादित पर्वतावर धम्माल मस्ती करताना दिसत आहेत. कॅलिफोर्नियाच्या मेमथ माऊंटेनस्थित स्की रिसॉर्टमधील हे फोटो आहेत. प्रियंकाने हे फोटो आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केले आहेत. निकनेही या ‘‘Superbowl Hang’’चा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या कपलसोबत प्रियंकाची आई मधू चोप्रा आणि सासूबाई व कुटुंबीय असे सगळे आहेत. प्रियंका व निक आपल्या कुटुंबीयांसोबत स्रोफॉलचा आनंद घेताना फोटोत दिसत आहे.

निकयंका गतवर्षी १ व २ डिसेंबरला लग्नबंधनात अडकले. हे लग्न गतवर्षीच्या चर्चित लग्नांपैकी एक होते. लग्नानंतर प्रियका व निकने तीन ग्रॅण्ड रिसेप्शन दिलीत. अगदी अलीकडे  प्रियंकाच्या सासू सास-यांनी सूनेसाठी खास वेलकम पार्टी ठेवली होती. या वेलकम पार्टीचे फोटो व व्हिडिओंनी इंटरनेटवर आग लावली होती.

प्रियंकाच्या प्रोफेशनल लाईफबद्दल सांगायचे तर लवकरच तिचा ‘इजन्ट इट रोमॅन्टिक’ हा हॉलिवूड चित्रपट रिलीज होतोय. याशिवाय ‘स्काय इज पिंक’ या चित्रपटातून तू बॉलिवूडमध्ये वापसी करतेय. या चित्रपटात ती फरहान अख्तरसोबत दिसणार आहे. जायमा वसीमही यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. या चित्रपटाचे काही शूटींग शिल्लक आहे. या शूटींगसाठी प्रियंका लवकरच भारतात येणार असल्याचे कळतेय. याशिवाय सध्या ती बेरी लेविन्सनसोबत एका प्रोजेक्टवर काम करतेय. मा आनंद शीला यांच्या आयुष्यावरचा हा चित्रपट आहे.   गुरु मां शीला यांची व्यक्तीरेखा प्रियंका साकारणार आहे.

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास