Join us

कुणाल कपूर तोडणार का आलियाचं हृदय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2016 14:05 IST

‘कौन कितने पानी मैं’ नंतर कुणाल कपूर ‘बी टाऊन’ मधून जणू गायबच झाला होता. बॉलिवूडच्या गॉसिप्समध्ये नव्हे तर चाहत्यांच्या ...

‘कौन कितने पानी मैं’ नंतर कुणाल कपूर ‘बी टाऊन’ मधून जणू गायबच झाला होता. बॉलिवूडच्या गॉसिप्समध्ये नव्हे तर चाहत्यांच्या आठवणीतूनही तो गायब झाला होता. पण आता कुणाल ‘बॉलिवूडच्या गॉसिप्स’ मध्ये परतलायं. आता कसा? तर कुणाचे तरी ‘हार्टब्रेक’ करून. हे ऐकल्यानंतर कुणालने कुणाचे ‘हार्टब्रेक’ केले, असा प्रश्न तुम्हाला निश्चितपणे पडला असेल. तर चुलबुली आलिया भट्टचे. विश्वास बसत नसेल तर ‘डिअर जिंदगी’ या आगामी चित्रपटाची तिसरा टीझर तुम्हाला बघावा लागेल. यात कुणाल आलियाचे हृदय तोडतो आणि ‘हार्टब्रेक’ झालेली आलिया फ्रिजमध्ये काहीतरी खायला शोधतेय,असे दाखवण्यात आलेय. आलिया भट्ट आणि शाहरूख खान यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटात कुणाल  सहकलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटात ‘हायवे गर्ल’ आलिया हिच्यासोबत तीन मुख्य सहकलाकार असणार आहेत. ते म्हणजे कुणाल कपूर, ताहिर राज भसीन (?) (पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी घालण्याच्या मागणीनंतर ‘डिअर जिंदगी’च्या दिग्दर्शिका गौरी शिंदे यांनी अली जफर यालाच बदलण्याचा निर्णय घेतल्याचे कळतेय. अलीला चित्रपटातून काढण्यात आले असून त्याच्या जागी ताहिर राज भसीन याची वर्णी लागलीयं,अशी चर्चा आहे.) आणि अंगद बेदी.शाहरूख खान हा मेंटर/ थेरपिस्टच्या भूमिकेत असेल. शाहरूख खान आणि आलिया  यांचा एकत्र हा पहिलाच चित्रपट असून किंग खानसोबतची आलियाची केमिस्ट्री अनुभवणं चाहत्यांसाठी एक पर्वणीच असणार आहे.