Join us  

OMG! क्रिकेटपटू नाही तर या घटस्फोटीत दिग्दर्शकावर जडला अनुष्का शेट्टीचा जीव!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2020 1:09 PM

थांबता थांबेना अनुष्काच्या लव्ह लाईफची चर्चा...

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी अनुष्का एका क्रिकेटपटूला डेट करत असल्याची बातमी होती.

बाहुबली 2  या चित्रपटानंतर कधी नव्हे इतकी लोकप्रिय झालेली ‘देवसेना’ अर्थात साऊथ सुपरस्टार अनुष्का शेट्टी कितीही खुलासे करो, पण सध्या तरी तिच्या लव्हलाईफच्या चर्चा थांबायच्या नाहीत .आधी  अनुष्का व प्रभासच्या लव्ह लाईफच्या चर्चा रंगल्या. अगदी दोघेही लग्न करणार, असेही म्हटले गेले. यानंतर अलीकडे अनुष्का प्रभासला नाही तर एका क्रिकेटपटूला डेट करत असल्याची चर्चा रंगली. आता मात्र एक नवीच चर्चा कानावर येतेय. होय, क्रिकेटपटू नाही तर अनुष्का शेट्टी एका दिग्दर्शकाच्या प्रेमात असल्याचे कळतेय. या दिग्दर्शकाचे नाव आहे, प्रकाश कोवलामुडी. प्रकाश कोवलामुडी घटस्फोटीत आहे.

चर्चा खरी मानाल तर साऊथचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक के. राघवेंद्र यांचा मुलगा प्रकाश कोवलामुडीसोबत अनुष्का लवकरच लग्नबंधनात अडकू शकते. प्रकाशचा घटस्फोट झाला आहे. 2014 मध्ये त्याने लेखिका कनिका ढिल्लनसोबत लग्न केले होते. पण दोन वर्षांनंतर दोघांनी घटस्फोट घेतला. प्रकाशने साऊथच्या काही चित्रपटात कामही केलेय.

कंगना राणौतच्या ‘जजमेंटल है क्या’ या सिनेमाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. याच घटस्फोटीत दिग्दर्शकावर सध्या अनुष्का शेट्टीचा जीव जडल्याचे कळतेय. अर्थात अद्याप अनुष्काने याबद्दल कुठलाही खुलासा केलेला नाही.

काही दिवसांपूर्वी अनुष्का एका क्रिकेटपटूला डेट करत असल्याची बातमी होती. क्रिकेटपटू नॉर्थमधील असून साऊथ रणजी टीमसाठी खेळत असल्याचे म्हटले गेले होते. त्याच्या नावाचा मात्र खुलासा झाला नव्हता. कालांतराने या नावाचा खुलासा होईल, अशी अपेक्षा असतानाच अनुष्काने या सगळ्या अफवा असल्याचे स्पष्ट केले होते.   केवळ इतकेच नाही तर अशा खोट्या अफवा पेरणाºयांबद्दल संतापही व्यक्त केला होता.

टॅग्स :अनुष्का शेट्टी