Join us

​फवाद बनणार का अभिनेत्याचा नेता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2016 14:50 IST

पाकिस्तानी कलाकार फवाद खान याला नवी वाट खुणावू लागलीय. फवाद अभिनेत्यासोबतच नेता बनण्याच्या तयारीत असल्याची आहे. होय, ऐकता ते ...

पाकिस्तानी कलाकार फवाद खान याला नवी वाट खुणावू लागलीय. फवाद अभिनेत्यासोबतच नेता बनण्याच्या तयारीत असल्याची आहे. होय, ऐकता ते खरे आहे. पाकिस्तानच्या राजकारणात उतरण्यावर फवाद गंभीरपणे विचार करतो आहे. पाकच्या राजकारणात मोठा दबदबा असलेला राजनेता व माजी क्रिकेटपटू इम्रान खान याने फवादला त्याचा पक्षात प्रवेश करण्याची आॅफर दिलीयं. इम्रान खान तेहरिक-ए-इन्साफ या राजकीय पक्षाचा अध्यक्ष आहे. फवादने आपल्या पक्षात यावे, अशी इम्रानची इच्छा आहे. एकार्थाने फवादच्या लोकप्रीयता ‘कॅश’ करण्याचा इम्रानचा प्रयत्न आहे. आता ही आॅफर फवाद स्वीकारणार की नाही, हे ठाऊक नाही.  अलीकडे फवादचा ‘ऐ दिल है मुश्किल’ हा चित्रपट रिलीज झाला. फवादमुळेच हा चित्रपट अडचणीत सापडला होता.  एक ना अनेक अडचणी पार करत शेवटी एकदाचा ‘ऐ दिल है मुश्किल’ प्रदर्शित झाला खरा. पण यातील फवादचा कॅमिओ रोल पाहून त्याच्या चाहत्यांची कधीनव्हे इतकी निराशा झाली. कारण फवादच्या वाट्याला अतिशय लहानशी भूमिका आली. निश्चितपणे फवादला नव्या आणि मोठ्या भूमिकेत पाहणे त्याच्या चाहत्यांना आवडेल. पण सध्याची स्थिती बघता तरी तसे वाटत नाही. पाकिस्तानी कलाकारांना आपल्या चित्रपटात घेण्यास कुठलाही निर्माता-दिग्दर्शक तयार नाही. त्यामुळे फवादचे पुन्हा भारतात येण्याची शक्यता तशी कमीच आहे. अशास्थितीत राजकारणात उतरण्याचा निर्णय फवादसाठी नक्कीच फायद्याचा ठरणारा आहे.